गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहेत. भर उन्हाळ्यात देखील अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यामुळे उन्हाचा पारा देखील उंचावला आहे. अशातच मुंबई शहरात देखील अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली आहे.
(हेही वाचा – Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे मराठवाडा मधील नागरिक हैराण; १५३ गावांचे नुकसान)
शनिवार २९ एप्रिल पासून मुंबईसह इतर उपनगर परिसरात ढगाळ वातावरण बघायला मिळत असून रविवार ३० एप्रिल रोजी सकाळपासून मुंबईतील अनेक भागात अवकाळी (Unseasonal Rain) पावसाने हजेरी लावली आहे. तर भारतीय हवामान खात्याकडून येत्या ५ मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील हवामान हे संमिश्र स्वरूपाचे पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात शनिवार २९ एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजेनंतर काहीसा जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. हा पाऊस सुमारे १५ मिनिटे मुसळधार पाऊस झाला, (Unseasonal Rain) त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. तर रविवार ३० एप्रिल रोजी सकाळी नालासोपारा आणि दादर या भागांमध्ये पावसाने आपली हजेरी लावली.
हेही पहा –
या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज व यलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट (Unseasonal Rain) देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community