काय सांगताय… आता लवकरच हवेत उडणाऱ्या बस दिसणार!

172

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांनी आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं मिळावी म्हणून आश्वासनांचा वर्षाव केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत दिलेले आश्वासन चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी गडकरींनी लवकरच हवेत उडणाऱ्या बसेस पाहायला मिळतील अशी घोषणा केली. इतकेच नाही तर त्यांनी हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले गडकरी

‘आता प्रयागराजमध्ये हवेत उडणारी बस चालवली जाईल. ज्याचा डीपीआर तयार केला जात आहे’, असे नितीन गडकरी म्हणाले. या योजनेबाबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही कळवले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. दिल्लीहून प्रयागराजला सी प्लेनमध्ये बसून त्रिवेणी संगम येथे उतरू, ही आपली इच्छा आहे एका नव्या युगाच्या विकासाची गोष्ट आहे, असे जाहीर सभेत गडकरी म्हणाले. यासह त्यांनी सी प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक आश्वासनं दिलीत. म्हणजेच प्रयागराजमध्ये सी प्लेन सेवा सुरु करण्याचे स्वप्न आहे, ज्यामुळे दिल्लीवरुन उड्डाण करुन संगमच्या पाण्यातून प्रयागराजमध्ये लँण्डिंग करु शकतो आणि लवकरच हेदेखील सत्यात उतरणार आहे, असेही गडकरी म्हटले आहे.

(हेही वाचा – “बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल, ही आमची संस्कृती नाही!”)

‘मी जे बोलतो ते करतो’

यापुढे बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत उत्तर प्रदेशात झालेला विकास आणि विकास कामे ही ट्रेलर आहे. माझ्या विभागाकडे पैसा आहे. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. मी करोडोंमध्येच चर्चा करतो. प्रयागराजमध्ये बांधण्यात येत असलेला रिंग रोड आणि फाफामऊमध्ये गंगा नदीवरील पूल हा २०२४ पर्यंत बांधून पूर्ण होईल. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, हायड्रोजन इंधनाचाही वापर केला जाईल. राज्यात ऊसाचे उत्पन्न मुबलक प्रमाणात घेतले जाते. याच्या मदतीने इथेनॉल तयार केले जाईल, जे वाहनांमध्ये टाकले जाईल. सध्या जी वाहने ११० रुपये लिटर पेट्रोलवर चालतात, त्यात इथेनॉलच्या वापरामुळे हा खर्च ६८ रुपयांपर्यंत खाली येणार आहे. मी जे बोलतो ते करतो. प्रयागराज शहर पश्चिम भाजपचे विद्यमान आमदार आणि यूपीचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेवेळी गडकरींनी या सर्व गोष्टी सांगितल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.