उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक निर्धारित वेळेतच, आयोगाचं स्पष्टीकरण

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका वेळेवर होतील असे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिले आहेत. यूपी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते. कोरोना वाढत असला तरी सर्वच पक्षांना निवडणुका हव्या आहेत असे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ एक तास वाढवणार असल्याची घोषणा देखील यावेळी केली आहे. मतदान सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.

कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून होणार मतदान

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आमची भेट घेतली आणि आम्हाला सांगितले की विधानसभा निवडणुका सर्व कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून वेळेवर व्हाव्यात. याबाबत 3 दिवस आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी 5 जानेवारी रोजी येणार आहे. उत्तर प्रदेशात नवीन मतदार आणि महिला मतदारांची संख्या 52 टक्क्यांनी वाढली आहे. सर्व राजकीय पक्ष वेळेवर निवडणुकीच्या बाजूने आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत.

(हेही वाचा – आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण)

ओमिक्रॉनच्या सावटाखाली मतदान

आगामी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यात कोविड महामारी काळात कशाप्रकारे निवडणुकीचे नियोजन असणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सोमवारी कोरोनाच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. ज्यामध्ये ओमिक्रॉनच्या सावटाखालीच मतदानाला सामोरे जावे लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व उपाययोजना करण्यात येणार असून निवडणूक राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here