धर्मांतरणाचे रॅकेट चालवणा-याला नाशिकमधून अटक! नाव बदलून रचला इस्लामीकरणाचा डाव

106

उत्तर प्रदेशात धर्मांतराचं रॅकेट चालवण्या प्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत नाशिकच्या आनंद नगर भागातून एकाला अटक करण्यात आली आहे. आतिफ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो कुणाल हे नाव धारण करुन नाशिक येथील आनंद नगर परिसरात वास्तव्यास होता.

कोण आहे आतिफ?

आतिफच्या खात्यात परदेशातून कोट्यवधी रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे धर्मांतरण प्रकरणात आतिफचा सहभाग असल्याचा संशय उत्तर प्रदेश एटीएसला आहे. आतिफच्या खात्यात हे पैसे कुठून आले याबाबत एटीएसकडून तपास करण्यात येत आहे.

(हेही वाचाः अवैधरित्या धर्मांतरण करणा-या संघटनांवर ईडीची छापेमारी! विदेशी फंडिंग होत असल्याचा संशय)

याआधीही महाराष्ट्रातून एकाला अटक

याआधीही उत्तर प्रदेशातील धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले होते. जून महिन्यात बीड जिल्ह्यातील इरफान शेख या तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या शिरसाळा या गावी इरफान शेख हा मूकबधिर विद्यार्थ्यांना विविध आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करत असल्याचा प्रकार त्यावेळी उघडकीस आला होता. प्राध्यापक म्हणून काम करत असताना तो धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवत असल्याचा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता.

उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

सामाजिक कार्यक्रमांच्या नावाखाली धर्मांतरणाचा डाव मांडत, इस्लामीकरणाचे जाळे पसरवणा-या मुख्य आरोपीला उत्तर प्रदेश एटीएसकडून 22 सप्टेंबर रोजी मौलाना कलीम सिद्दीकी याला अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या एकूण सहा तुकड्यांनी केलेल्या अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर या षडयंत्राचा सूत्रधार गजाआड झाला. इस्लामीकरणाचा आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी त्याने ‘जामिया इमाम वलीउल्ला’ नामक एका गैर सरकारी संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेला देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद पुरवण्यात येत होती. तसेच इस्लामीकरणाच्या कार्यासाठी ही संस्था देशातील मदरस्यांना देखील आर्थिक मदत करत होती.

(हेही वाचाः धर्मांतरणाचे रॅकेट चालवणारा मौलाना गजाआड! असे करत होता इस्लामीकरण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.