धर्मांतरणाचे रॅकेट चालवणारा मौलाना गजाआड! असे करत होता इस्लामीकरण

114

सामाजिक कार्यक्रमांच्या नावाखाली धर्मांतरणाचा डाव मांडत, इस्लामीकरणाचे जाळे पसरवणा-या मुख्य आरोपीला उत्तर प्रदेश एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या एकूण सहा तुकड्यांनी केलेल्या अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर या षडयंत्राचा सूत्रधार गजाआड झाला आहे. इस्लामीकरणाच्या कार्यासाठी या आरोपीची संस्था मदरस्यांना देखील आर्थिक मदत करत होती.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक आणि मानवी सर्विलंसच्या आधारे उत्तर प्रदेश एटीएसला मौलाना कलीम सिद्दीकी धर्मांतरणाचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. इस्लामीकरणाचा आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी त्याने जामिया इमाम वलीउल्ला नामक एका गैर सरकारी संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेला देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद पुरवण्यात येत होती.

असे करत होता धर्मांतरण

देशात सामाजिक ऐक्य स्थापन करण्याच्या नावाखाली मौलाना कलीम वेगवेगळे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करत होता. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असणा-या लोकांना पैशांचे आणि इतर गोष्टींचे आमिष दाखवून इस्लाम स्वीकारण्यास सांगण्यात येत होते. या आमिषाला न भुलणा-या लोकांना मौलाना कलीम सिद्दीकी आणि त्याचे साथीदार जन्नत आणि जहन्नुमच्या गोष्टी सांगून आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करत असत. जे त्याच्या या भूलथापांना बळी पडून धर्मांतरित होत होते, त्यांच्यावर इतरांना धर्मांतरित करण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी सोपवण्यात येत होती.

इथून मिळत होती आर्थिक मदत

मौलाना कलीम सिद्दीकीचे धर्मांतरणासाठी लिहिलेले साहित्य ऑनलाईन आणि छापील स्वरुपात उपलब्ध आहे. या कार्यात कलीमचा संबंध एटीएसने यापूर्वी अटक केलेल्या उमर गौतमसोबत असल्याचे देखील उघडकीस आले आहे. उमर गौतमची संघटना अल हसन एज्युकेशनल अँड वेल्फेअर फाउंडेशनला निधी देणाऱ्या संस्थांनीच कलीम सिद्दीकीची संस्था जामिया इमाम वलीउल्लाह ट्रस्टला आर्थिक मदत केल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.