उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर हल्ला प्रकरणात युपी एटीएसचे पथक नवी मुंबईत दाखल झाले आहे. या हल्ला प्रकरणी अटकेत असलेला अहमद मूर्तजा अब्बासी हा नवी मुंबईतील सानपाडा येथील एका टॉवर्समध्ये राहण्यास होता. युपी एटीएसच्या पथकाने या परिसराची झाडाझडती घेतली आहे. सोमवारी दाखल झालेल्या युपी एटीएसच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटकेत असलेल्या अब्बासीने त्याच्या राहण्याच्या ठिकाणांपैकी सानपाडा येथील मुंबई मिलेनियम टॉवर्सचा उल्लेख केला होता. मात्र या नावाची व्यक्ती या ठिकाणी राहत नसल्याचे रहिवासी यांनी युपी एटीएसच्या पथकाला सांगितले.
काय आहे प्रकरण
गोरखपूर मधील गोरखनाथ मंदिरावर रविवारी झालेल्या हल्ला प्रकरणी युपी एटीएसने अहमद मूर्तजा अब्बासी याला अटक केली होती. अब्बासीने मंदिरात बळजबरीने प्रवेश करून तेथील सुरक्षा रक्षकावर हल्ला केला होता. अटक करण्यात आलेल्या अहमद मुर्तजा अब्बासी याच्या चौकशीत तो मूळचा गोरखपूरचा राहणारा असून त्याने मुंबई आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरची शिक्षण घेतले आहे. यादरम्यान त्याने कुठे कुठे वास्तव्य केले याचा शोध घेतला जात आहे. त्यामध्ये २०१३ मध्ये त्याने नवीमुंबईतील सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्समध्ये राहत असल्याचा उल्लेख केला.
या चौकशीकामी सोमवारी युपी एटीएसचे पथक नवी मुंबईतील सानपाडा येथे दाखल झाले होते. त्यांनी या टॉवर्समध्ये राहणाऱ्या रहिवाश्यकडे चौकशी केली मात्र या नावाची व्यक्ती या ठिकाणी राहण्यास नव्हती अशी माहिती रहिवासी यांनी युपी एटीएसला दिली. एटीएसने परिसराची झाडाझडती घेतली मात्र त्याच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अहमद मूर्तजा अब्बासी हा नाव बदलून या ठिकाणी राहत असावा, आणि त्याचे थेट संबंध मुस्लिम धर्मगुरू जाकीर नाईक यांच्यासोबत असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहे अहमद मुर्तजा अब्बासी?
अहमद मुर्तजा अब्बासी यांच्याशी संबंधित अनेक माहिती समोर आली आहे. आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी हा गोरखपूरच्या सिव्हिल लाइन भागातील रहिवासी आहे. मुर्तझा अब्बासी याचे वडील मोहम्मद मुनीर हे अनेक वित्त कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार होते. अहमद मुर्तझा अब्बासी यांनी २०१५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१५ मध्ये इंजिनिअरिंगमधून उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आणि नंतर एस्सार पेट्रोकेमिकल्समध्ये नोकरी केली. त्याचे लग्न झालेले असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अहमद मुर्तझा अब्बासी याच्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केले असून तो मुंबईत राहत होता. मुर्तझा अब्बासी याच्यावर अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून अहमद मुर्तझा अब्बासी याच्या मित्रांच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या. आरोपी मुर्तझा अब्बासीचे पहिले लग्न ठरवाताना चर्चेदरम्यान मोडले होते. अब्बासी याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले मात्र तिनेही सोडचिठ्ठी दिली. दरम्यान मुर्तझा अब्बासी याने केलेल्या गोरखपूर येथील हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहे.
Join Our WhatsApp Community