‘दोन दिवसात सगळं सुरळीत होईल…’, परबांनी मागितली जनतेची माफी!

144

येत्या दोन दिवसांत एसटीचे 100 टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील आणि महाराष्ट्राची लालपरी पूर्णपणे सुरु होऊन सगळं सुरळीत होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्यातील एसटीची 90 टक्के सेवा सुरु झाली आहे. एसटीचे 70 हजार कर्मचारी सेवेत रुजू झाले असून आता एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 82 हजारांच्या आसपास आहे. तसेच राज्यातील अनेक एसटी आगारात 100 टक्के कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचारी देखील येत्या दोन दिवसात कामावर परततील आणि राज्यातली एसटीची सेवा पूर्णपणे सुरु होईल, असे म्हणत अनिल परबांनी जनतेची माफी मागितली आहे.

… आणि परबांनी मागितली माफी

या लढाईत कामगारांच्या पदरात काहीच पडले नाही. इतर राज्यांच्या तुलनेत आम्ही चांगला पगार दिला. मात्र हा संप बराच काळ चालला. मी एसटी महामंडळाचा अक्ष्यक्ष म्हणून माफी मागतो की, गेल्या पाच महिन्यात राज्यातल्या जनतेला जो त्रास झाला आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे असे प्रसंग येणार नाहीत. त्याचबरोबर गरीबाची जीवनवाहिनी सुरु राहिली पाहिजे, असे मला वाटते, असे एसटी कामगारांविषयी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहे.

(हेही वाचा -आता मुंबईतली BEST लवकरच होणार १०० टक्के इलेक्ट्रिक! )

अनिल परब पुढे असेही म्हणाले, संपकाळात ज्या कर्मचा-यांवर निलंबनाची, बडतर्फची कारवाई करण्यात आली होती. त्यांना देखील आम्ही कामावर परत घेतले आहे तसे आम्ही उच्च न्यायालयात सांगितले होते. 22 एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर परत येतील त्यांनाही आम्ही परत रुजू करुन घेऊ. यापूर्वी 7 वेळा आम्ही कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.