जर तुम्ही यूपीआय अॅप्स (UPI App Payment Alert) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जीपे, पेटीएम, फोनपे आणि भारतपे या सारख्या सर्व यूपीआय अॅप्सना निष्क्रिय यूपीआय खाती ब्लॉक करण्यास सांगितले आहे. ज्यांनी गेल्या एक वर्षापासून त्यांचा यू. पी. आय. आयडी वापरला नाही त्यांची यू. पी. आय. खाती बंद केली जातील. ३१ डिसेंबरनंतर सर्व कंपन्या अशी खाती बंद करण्यास सुरुवात करतील.
(हेही वाचा – Russia-Ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; तब्बल १२२ क्षेपणास्त्रे आणि ३६ ड्रोनचे प्रक्षेपण)
ट्रायच्या आदेशानुसार, दूरसंचार कंपन्या ९० दिवसांनंतर दुसऱ्या वापरकर्त्यास (UPI App Payment Alert) निष्क्रिय केलेले सिम कार्ड म्हणजेच डिॲक्टिव्हेटेड सिमकार्ड देऊ शकतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने ९० दिवस तो नंबर किंवा ते सिमकार्ड वापरले नाही तर, तो नंबर दुसऱ्या व्यक्तीला मिळेल.
(हेही वाचा – PM Narendra Modi : रोजगार वाढवणे हे सरकारचे सर्वोच्च उद्दिष्ट)
… म्हणून ही युपीआय खाती होणार बंद –
मात्र मूळ समस्या अशी आहे की, तुम्ही त्याच सिमकार्डचा (UPI App Payment Alert) नंबर जर तुमच्या बँकेशी जोडला असेल आणि चुकून तुमच्याकडून तुमचा नवीन नंबर बँकेशी जोडायचा राहिला तर तुमचा जुना सिमकार्डचा नंबर ज्या व्यक्तीला मिळाला आहे तो त्याचा वापर करून तुमचे यू. पी. आय. ऍप्स सक्रिय करेल. लोकांना याच समस्येपासून वाचवण्यासाठी एनपीसीआयने यूपीआय अॅप्सना गेल्या एक वर्षापासून निष्क्रिय असलेली सर्व खाती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
युपीआय व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी…
एनपीसीआयने म्हटले आहे की, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या परिपत्रकात (UPI App Payment Alert) टीपीएपी आणि पीएसपी बँकांना यूपीआय आयडी, संबंधित यूपीआय क्रमांक आणि एका वर्षापासून यूपीआय अॅपद्वारे कोणतेही आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार न केलेल्या ग्राहकांचा फोन नंबर ओळखण्यास सांगितले आहे. एनपीसीआयने अशा ग्राहकांचा यू. पी. आय. आयडी आणि यू. पी. आय. क्रमांक अंतर्गत व्यवहारांपासून ब्लॉक करण्यास आणि यू. पी. आय. मॅपरमध्ये त्यांची नोंदणी रद्द करण्यास सांगितले आहे. युपीआय व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या यू. पी. आय. अॅपद्वारे पुन्हा नोंदणी करणे आणि यू. पी. आय. आयडी जोडणे आवश्यक असणार आहे.
(हेही वाचा – Lakhbir Singh Landa : भारत सरकारकडून लखबीर सिंह लांडा दहशतवादी म्हणून घोषित)
BHIM अॅपचा वापर करून UPI अकाउंट असे करा सेट
१. सर्वात आधी Google Play Store अथवा Apple App Store वरून BHIM अॅप डाउनलोड करा.
२. आता तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा निवडा.
३. बँक अकाउंटशी रजिस्टर्ड मोबाइल नंबर निवडा.
४. चार आकडी लॉग इन पासवर्ड सेट करा. अॅपचा अॅक्सेस करण्यासाठी चार आकडी पासवर्डची गरज पडेल.
५. त्यानंतर बँक अकाउंट निवडा आणि त्याच्याशी लिंक करा. तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे ६ आकडे आणि Expiry डेट लिहा व यूपीआय पिन सेट करा.
६. यानंतर तुमचे अकाउंट रजिस्टर्ड होईल आणि यानंतरच तुम्ही अकाउंटवरून (UPI App Payment Alert) पैसे ट्रान्स्फर करू शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community