ऑनलाईन व्यवहार करताय? UPI पेमेंटसाठी आता Paytm, GPay, PhonePe वर मर्यादा; किती असणार लिमिट?

112

आजच्या काळात प्रत्येकजण UPI पेमेंट वापरताना दिसतो. रस्त्यावरील छोट्याशा भाजी विक्रेत्यापासून ते मॉलमधील फॅशनेबल ब्रॅण्डच्या दुकानात हल्ली सर्वत्र UPI पेमेंटचा पर्याय उपलब्ध असतो. तुम्ही देखील पेटीएम, जीपे आणि फोनपे सारख्या विविध UPI पेमेंट अॅप्लिकेशनचा वापर करतात का तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. Google Pay (GPay), फोन पे, अॅमेझॉन पे (Amazon Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या सर्व कंपन्यांनी दररोज व्यवहार करण्यासाठी मर्यादा निश्चित केली आहे, ज्यामुळे देशातील करोडो UPI युजर्सवर त्याचा परिणाम होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI कडून या संदर्भात अधिसूचना जारी करून माहिती देण्यात आली आहे.

(हेही वाचा – आता ‘आधार’वरून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, UIDAI ची मोठी माहिती!)

दररोज किती व्यवहार करता येणार

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता UPI द्वारे दररोज फक्त 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे. तर काही छोट्या बँकांनी ही मर्यादा 25,000 पर्यंत निश्चित केली आहे. यासह तुम्ही कोणत्या अॅपद्वारे दररोज किती रूपयांचा व्यवहार करू शकता ते जाणून घ्या…

Amazon Pay ची मर्यादा किती?

Amazon Pay ने UPI द्वारे पेमेंटची कमाल मर्यादा रु 1,00,000 निश्चित केली आहे. Amazon Pay UPI वर नोंदणी केल्यानंतर, युजर्स पहिल्या 24 तासात केवळ 5000 रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतो.

Paytm नेही केली मर्यादा निश्चित

Paytm UPI ने युजर्ससाठी 1 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे. तर आता तुम्ही दर तासाला फक्त 20,000 रुपयांचे व्यवहार करू शकता. याशिवाय एका तासाला 5 व्यवहार आणि एका दिवसात फक्त 20 UPI व्यवहार करता येणार असल्याचे पेटीएमने सांगितले आहे.

PhonePe ची मर्यादा किती आहे?

PhonePe ने दैनंदिन UPI ​​व्यवहाराची मर्यादा रु 1,00,000 निश्चिक केली आहे. याशिवाय, बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखादी व्यक्ती PhonePe UPI द्वारे दररोज जास्तीत जास्त 10 किंवा 20 व्यवहार करू शकते.

Google Pay ने करता येणार फक्त 10 व्यवहार

Google Pay किंवा GPay ने सर्व UPI अॅप्स आणि बँक खात्यांवर एकूण 10 व्यवहारांची मर्यादा निश्चित केली असून युजर एका दिवसात फक्त 10 व्यवहार करू शकणार आहे. याद्वारे तुम्ही दररोज एक लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहात. तर Google Pay आणि Phone Pay वर दर तासाच्या हिशोबाने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. या अॅपद्वारे जर कोणी तुम्हाला 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची विनंती पाठवत असेल तर या अॅप्लिकेशनकडून रोखली जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.