UPSC CAPF 2022: सैन्य दलात भरती होण्याची इच्छा आहे? आताच करा असा अर्ज

124

केंद्रीय लोकसेवा आयोग केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अधिसूचना बुधवारी जारी होत आहे. UPSC परीक्षा कॅलेंडर 2022 नुसार, 20 एप्रिल 2022 रोजी अधिसूचना जारी झाल्यामुळे, नोंदणी प्रक्रिया (UPSC CAPF नोंदणी) देखील सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना सैन्यात भरती होण्याची इच्छा असेल अशांनी आजच अर्ज करा. येथे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे. या जागेवर महिला आणि पुरूष दोघेही अर्ज करू शकतात. मात्र अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एनसीसी प्रमाणपत्र बंधनकारक असणार नाही. पण जर एनसीसी बी किंवा सी प्रमाणपत्र असेल तर मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व चाचणीत त्याचा फायदा होणार आहे.

(हेही वाचा – ‘दोन दिवसात सगळं सुरळीत होईल…’, परबांनी मागितली जनतेची माफी! )

अर्जाचा फॉर्म 10 मे 2022 पर्यंत ऑनलाइन उपलब्ध असणार असून तो भरता येणार आहे. उमेदवार 10 मे 2022 पर्यंत upsconline.nic.in वर त्यांचा अर्ज अपलोड करू शकतात. यासाठीची परीक्षा 07 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून भरती प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे असणार आहे.

UPSC CAPF AC 2022: महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022
  • UPSC CAPF प्रवेशपत्र 2022: 20 जुलै 2022 संभाव्य
  • UPSC CAPF 2022 परीक्षेची तारीख: 7 ऑगस्ट 2022

अशी असणार पात्रता

ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवी घेतली असून ते पदवीधर असतील ते ते उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे आहे.

इच्छुक उमेदवार या पदांसाठी (UPSC CAPF AC 2022) कसे अर्ज करू शकतील, त्याची माहिती अधिसूचना जारी झाल्यानंतर दिली जाईल. जे उमेदवार 7 ऑगस्ट 2022 च्या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना दुसऱ्या फेरीत बसण्याची संधी मिळणार आहे. मुलाखतीसोबत शारीरिक कार्यक्षमता चाचणीही घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.