अमेरिका: मेक्सिकोमधील कारागृहात बंदूकधारीचा हल्ला; 14 जणांचा मृत्यू, तर 24 कैदी फरार

91

उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोममध्ये एका कारागृहात अज्ञात बंदूकधारकांनी गोळीबार केला आहे. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झााला असून, 24 कैदी पळून गेले आहेत. मृतांमध्ये 10 सुरक्षारक्षकांसह 4 कैद्यांचा समावेश आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिओडाड जु्आरेजमधील एका तुरुंगावर अज्ञात बंदुकधारींनी हल्ला केला. ज्यात 14 जण ठार झाले असून, 24 कैदी पळून गेले आहेत.

चिहुआहुआ स्टेट प्राॅसिक्यूटच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यादरम्यान, अज्ञात बंदुकधारींनी Armored Vehicles चा वापर केला होता. मृतांमध्ये 10 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. तर चार कैद्यांचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

( हेही वाचा: चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू )

गोळीबारानंतर गोंधळ

स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षानिमित्त काही कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी कॅम्पबाहेर थांबले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर कारागृह आणि आसपासच्या परिसरात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. तुरुंगात अनेक कैद्यांनी काही वस्तूंना आग लावली आणि कारागृहाच्या सुरक्षारक्षकांशी झटापट केली, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे. सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु असून, पळून गेलेल्या कैंद्याचाही शोध सुरु आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.