ऐकावं ते नवलंच! माणसाच्या शरीरात आता डुकराचं ह्रदय धडधडणार!

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने सोमवारी एक निवेदन जारी करून आश्चर्यकारक माहिती सांगितली आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी डुकराच्या ह्रदयाची मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केलं आहे. अमेरिकेच्या डॉक्टरांनी 57 वर्षांच्या एका व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अनुवांशिक पद्धतीनं संशोधित करण्यात आलेल्या डुकराच्या ह्रदयाचं प्रत्यारोपण करण्यात आलं. ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील मोठं यश मानलं जात आहे. इतकेच नाही तर कोरोना महामारीत ही बातमी विज्ञान क्षेत्रासाठी कौतुकास्पद मानली जात आहे.

अवयव दानातील कमतरता भरून निघणार

डेव्हिड बेनेट असे नाव असणाऱ्या 57 वर्षाच्या व्यक्तीला डुकराचे हृदय बसवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील हा पहिलाच प्रयोग अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेतील औषध नियामक संस्थेने नव्या वर्षाच्या सुरूवातीला या सर्जरीला परवानगी दिली होती. त्यानुसार मागच्या शुक्रवारी डॉक्टरांनी डुकराचे हृदय या व्यक्तीच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण करून त्याचे प्राण वाचवले. ही हृदय प्रत्यारोपणाची सर्जरी झाल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित रूग्ण व्यवस्थित झाला. या यशस्वी सर्जरीनंतर आता अवयव दानातील कमतरता भरून निघेल अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे.

(हेही वाचा – विवाहबाह्य आणि वैवाहिक संबंध ‘समांतर’ नाही; काय म्हणालं उच्च न्यायालय, वाचा…)

नवं ह्रदय कसं काम करतं याचं परिक्षण सुरू

सध्या शरीरात प्रत्यारोपत करण्यात आलेलं ह्रदय कसं काम करतंय याचं परिक्षण केलं जात आहे. डॉक्टर डेविड बेनेट यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. मेरिलँडमधील रहिवासी असलेल्या डेविड बेनेट यांनी शस्त्रक्रियेपूर्वीच्या एक दिवस अगोदर मला मरु द्या किंवा ह्रदय प्रत्यारोपण करा, असं म्हटलं होतं. मात्र या शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे, तर गेल्या काही दिवासंपासून डेविड बेनेट हे हार्ट लंग बायपास मशीनचा वापर करत होते. आता ठीक झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्यास इच्छूक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here