Israel-Palestine Conflict : दोघेही लोकशाहीचे शत्रू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हमास-पुतिन यांच्यावर हल्लाबोल

आम्ही हमास सारखे दहशतवादी आणि पुतिनसारखे हुकूमशाहांना जिंकू देऊ सकत नाही आणि आम्ही असं होऊ देणार नाही.

119
Israel-Palestine Conflict : दोघेही लोकशाहीचे शत्रू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हमास-पुतिन यांच्यावर हल्लाबोल
Israel-Palestine Conflict : दोघेही लोकशाहीचे शत्रू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हमास-पुतिन यांच्यावर हल्लाबोल

गेल्या काही दिवसापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोन दिवसापूर्वी इस्त्रायलला भेट दिली. बायडेन यांनी गुरुवारी ओव्हल ऑफिसमधून राष्ट्राला दिलेल्या भावनिक संदेशात म्हटले आहे की, हमास आणि रशिया दोन्ही लोकशाहीचा “नाश” करण्यावर झुकत आहेत. या सोबतच त्यांनी युक्रेन आणि इस्त्राइल हे अमेरिकेच्या हितासाठी महत्वपूर्ण असून या दोन्ही देशांना मदत देण्याचा देखील पुनरुच्चार त्यांना केला. (Israel-Palestine Conflict )

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ओव्हल ऑफिस येथून देशाला संबोधित केलं, यावेळी त्यांनी हमास आणि रशिया हे दोघेही लोकशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. हमास आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोन वेगवेगळ्या संकटाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचा हेतू एकसारखाच आहे. दोघांनाही लोकशाही पूर्णपणे नष्ट करायची आहे, असे बायडन यावेळी म्हणाले.

(हेही वाचा : Devendra Fadnavis : वादग्रस्त कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय, पवार-ठाकरेंवर गंभीर आरोप)

बायडन पुढे बोलताना म्हणाले की, अमेरिका एक महान राष्ट्र म्हणून असलेली आपली जबाबदारी सांभाळात अशा पद्धतीचं पक्षपाती आणि हिंसक राजकारण होऊ देऊ शकत नाही. आम्ही हमास सारखे दहशतवादी आणि पुतिनसारखे हुकूमशाहांना जिंकू देऊ सकत नाही आणि आम्ही असं होऊ देणार नाही. इस्त्राइल हमास युद्धाबाबत बायडन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्यासाठी दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा मोठं काहीच नाही. ते म्हणाले, मी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष अब्बास यांच्याशीही बोललो आणि युनायटेड स्टेट्स पॅलेस्टिनी लोकांच्या सन्मान आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. राष्ट्राध्यक्ष बायडन म्हणाले की पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूने इतरांप्रमाणेच त्यांनाही दु:ख झाले आहे. विशेषत: गाझा रुग्णालयातील स्फोटामुळे झालेले दुःखद मृत्यू, ज्यामध्ये इस्रायलचा कोणताही सहभाग नाही. प्रत्येक निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूचे आम्हाला दुःख वाटते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.