होळीसाठी रासायनिक नको तर नैसर्गिक रंग वापरा ! 

276

एकमेकांमधील हेवेदावे, मनातील वाईट विचारांना दूर सारून आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे होळी. या दिवशी रंग आणि गुलाल एकमेकांवर उडवून होळी खेळण्याची मजा काही औरच असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजेच धुलिवंदन असते. नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि आपल्या प्रिय व्यक्तींसोबत खेळले जाणारे हे रंग वर्षभर मनातले दु:ख दूर करायला मदत करतात.

( हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला ‘टोल’मुळे बसणार कात्री! ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव)

या सणाच्या दरम्यान बाजारात अनेक प्रकारचे रंग आणि गुलाल विकत मिळतात, मात्र त्यामध्ये रासायनिक पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, त्यामुळे ते त्वचेसाठी धोकादायक असतात. मौजमजेच्या या सणाला आपण आपल्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी घेणेही गरजेचे आहे. याकरिता घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीनेही विविध प्रकारचे रंग, गुलाल तयार करता येतात. जे आरोग्यासाठी हानिकारक नसतात. या रंगांच्या साहाय्यानेही तुम्ही होळीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

लाल गुलाल 

  • होळीकरिता लाल गुलाल एकमेकांच्या अंगावर उडवण्यासाठी सर्रास वापरला जातो. घरी हा गुलाल तयार करण्यासाठी ३ चमचे कुंकू, १ चमचा चंदन पावडर आणि ५ चमचे मैदा घ्या.
  • हे तीनही पदार्थ व्यवस्थित एकमेकांत मिसळले की, झाला लाल गुलाल. लाल गुलाल तयार करण्याकरिता बाजारातून विकत घेतलेले कुंकू शुद्ध आणि भेसळविरहित असणे आवश्यक आहे.

गुलाबी गुलाल

लाल गुलालाप्रमाणेच गुलाबी रंगाचा गुलालही होळी खेळण्यासाठी आवर्जून वापरतात. हा गुलाल घरी तयार करण्याकरिता बाजारातून बीटरूट आणा. बीटरूट धुवून किसा. किसलेले बीट उन्हात कडकडीत वाळवा. ते व्यवस्थित कोरडे झाल्यावर त्याची पावडर करा. त्यामध्ये ३ चमचे तांदळाचे पीठ घाला. याचे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळल्यावर झाला गुलाबी रंगाचा सेंद्रिय आणि नैसर्गिक गुलाल.

केसरिया गुलाल

  • ३ चमचे शेंदूर घ्या. त्यामध्ये १ चमचा चंदन पावडर आणि ५ चमचे डाळीचे पीठ (बेसन) घाला. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळल्यावर होईल तयार होळीकरिता केशरी म्हणजेच केसरिया गुलाल. बाजारातून केशर सिंदूर खरेदी करू शकता किंवा हनुमानाला अर्पण केलेला ओला सिंदूरही यासाठी वापरू शकता.

हिरवा गुलाल

होळीकरिता हिरवा गुलाल तयार करण्यासाठी अन्नपदार्थाकरिता वापरला जाणारा (फूड ग्रेड) हिरवा रंग बाजारातून आणा. त्यामध्ये टॅल्कम पावडर मिसळा. हे प्रमाण १० चमचे टॅल्कम पावडर आणि १ चमचा फूड ग्रेड हिरवा रंग असे ठेवा. हे दोन्ही पदार्थ एकमेकांमध्ये मिसळे की, हिरवा गुलाल तयार होईल.

पिवळा गुलाल

  • होळीचा रंग खेळण्याकरिता पिवळ्या रंगाचा वापरही जास्त प्रमाणात केला जातो. घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तो सहजरित्या तयार करता येईल.
  • याकरिता ३ चमचे हळद पावडर, २ चमचे तांदळाचे पीठ, १ चमचा चंदन पावडर घ्या. हे तीनही पदार्थ व्यवस्थित एकत्रित केल्यास पिवळा सेंद्रिय गुलाल तयार होईल.

तपकिरी रंग

  • होळीचा तपकिरी रंग करण्यासाठी, मेंदी, गुसबेरी आणि हळद याची पावडर १:४ च्या प्रमाणात मिसळा. वैकल्पिकरित्या, तपकिरी रंग तयार करण्यासाठी पान कठ्ठा पाण्यात मिसळला जाऊ शकतो.
  • होळीचा पारंपरिक रंग मिळविण्यासाठी ‘जंगलाची ज्योत’ किंवा ‘पलाश’ किंवा ‘टेसू’ची फुले रात्रभर भिजवून किंवा उकळूनही ठेवता येतात. शेवटी, चहा किंवा कॉफीची पाने पाण्यात उकळवून घरच्या घरी हर्बल होळीचा रंग तयार करू शकतो.

सुरक्षितता कशी बाळगाल? 

  • नैसर्गिक होळीचे रंग बनवताना सुरक्षितता लक्षात घेणे आवश्यक आहे. वापरलेले सर्व घटक सुरक्षित आणि बिनविषारी आहेत याची खात्री करा आणि चिखल, अंडी किंवा वार्निश वापरणे टाळा. जर तुम्ही घरगुती रंग वापरत असाल तर ते शरीरावर लावण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे चांगले.
  • कोणत्याही रंगापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षणात्मक कपडे आणि चष्मा घाला. होळीचे रंग तोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, कारण काहींमध्ये विषारी पदार्थ असू शकतात जे हानिकारक असू शकतात.
    शेवटी, होळी खेळल्यानंतर रंग सौम्य शाम्पू आणि कोमट पाण्याने धुवा.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.