उत्तरप्रदेश: भरधाव ट्रकच्या धडकेत 6 कावडियांचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे शुक्रवारी मध्यरात्री भरधाव ट्रकच्या धडकेत 6 कावडियांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हरिद्वार येथून हे भाविक ग्वाल्हेरकडे निघाले असता हाथरस येथे शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटून त्याने कावड घेऊन जाणाऱ्या भाविकांना चिरडले. या भीषण अपघातात 5 जणांचा घटनास्थळी तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आग्रा पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

( हेही वाचा: शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आपण दु:खी होतो; चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here