उन्नावमध्ये आणखी एक निर्भया कांड; घरात घुसून अत्याचार, रक्तस्त्रावामुळे पीडितेचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधून पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. उन्नाव जिल्हा आणखी एका निर्भया कांड मुळे हादरले आहे. उन्नावमधील एका काॅलेजच्या तरुणीवर तिच्याच घरात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रक्तस्त्रावामुळे पीडितेचा मृत्यू झाला आहे.

10 नोव्हेंबर रोजी आरोपी तरुणीच्या घरी शक्तिवर्धक गोळ्या खाऊन पोहोचला. घरी इतर कुणीही नसल्याची संधी साधत त्याने तरुणीवर बलात्कार केला. पीडितेच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव सुरु झाल्यावर आरोपीने तिथून पळ काढला.

( हेही वाचा: गोवरबाधितांची संख्या वाढली; तीन केंद्रात रुग्णांना मिळणार उपचार )

उन्नावमध्ये तरुणीवर घरात घुसून अत्याचार

उन्नाव जिल्ह्यातील एका गावामध्ये दलित तरुणीचा मृतदेह घराच्या अंगणात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा आता पोलिसांनी खुलासा केला आहे. पीडितेचा मृतदेह अंगणामध्ये आढळला होता. तरुणी घरात एकटी होती. बलात्कारानंतर जास्त रक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू झाला. पीडिता आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. आरोपीने तिच्या घरात घुसून अत्याचार केला आणि तरुणीची हालत खराब झाल्यावर आरोपीने तिथून पळ काढला. रक्तस्त्रावामुळे पीडितेचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here