भीषण अपघात: दोन स्लीपर कोच बस एकमेकांना धडकल्या; 8 प्रवासी जागीच ठार

सोमवारी सकाळी दोन स्लीपर कोच बसमध्ये भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत हा अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत आठ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर 12 हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दोन स्लीपर कोच  बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. एका भरधाव बसने मागून दुस-या बसला धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली. तसेच जखमींनाही तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचा चक्काचूर झाला.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती 

अपघातातील गंभीर जखमींना सीएचसी हैदरगडहून लखनौ ट्राॅमा सेंटरला हलवण्यात आले. तर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बसला हायवेवरुन हलवण्यात आले. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे हायवेवरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केले दु:ख 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, आरोग्य यंत्रणेसह बचाव यंत्रणा आणि पोलिसांनाही सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here