एनआयएच्या अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा

115

2016 साली राष्ट्रीय तपास अधिकाऱ्याची (NIA) हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील स्थानिक न्यायालयाने मुनीर आणि रेहान या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 3 एप्रिल 2016 रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी एनआयए अधिकारी तनझिल अहमद हे बिजनौरमध्ये आपल्या पुतण्याच्या लग्नात सहभागी होऊन नवी दिल्ली येथे परतत असताना त्यांच्यावर 21 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

सिमी आणि इंडियाचे मुजाहिद्दीनच्या मॉड्युलशी संबंधित होता

अहमद हा पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करणार्‍या एनआयए टीमचा एक भाग होता आणि हा हल्ला सिमी आणि इंडियाचे मुजाहिद्दीनच्या मॉड्युलशी संबंधित होता. 2 आणि 3 एप्रिलच्या मध्यरात्री दुस-या गावात भाचीच्या लग्नाला उपस्थित राहून कुटुंबासह बिजनौर जिल्ह्यातील सहसपूर गावात परतत असलेल्या अहमद यांचा आरोपींनी पाठलाग केला. अहमद यांच्या हत्येमागील मुनीर हा मास्टरमाइंड होता. हल्लेखोरांनी त्याच्या गाडीला सहसपूर गावात ओव्हरटेक केले आणि मुनीरने अहमद आणि त्याच्या पत्नीवर गोळीबार केला. घटनेच्या 10 दिवसांनंतर फरझानाचा एम्समध्ये मृत्यू झाला. जिल्हा सरकारी वकील वरुण कुमार यांच्या म्हणण्यानुसार, 6 वर्षे चाललेल्या या खटल्यात 19 जणांनी साक्ष दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.