‘माझी बायको विडी ओढते’, नव-यानं थेट गाठलं पोलीस स्टेशन

149

उत्तर प्रदेशातील जहांगीराबाद येथे राहणा-या एका व्यक्ताने आपली पत्नी विडी ओढत असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. समजावूनही माझी पत्नी विडी ओढायचं सोडत नसल्याचं त्याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, साहेब माझी बायको विडी ओढते आणि विडीची मला अॅलर्जी आहे तसेच मी तिला अनेक वेळा असं न करण्याचे समजावून सांगितले, तरी ती ऐकत नाही. मला घटस्फोट मिळवून द्या अशी विनंती त्या व्यक्तीने पोलिसांकडे केली.

समजावूनही ऐकत नाही

या व्यक्तीची कैफियत ऐकल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीला बोलावून घेतले. तेव्हा टेन्शन आल्यावर मी विडी ओढते असं कारण त्या बायकोने सांगितलं हे ऐकून पोलिसही चक्रावून गेले. आठवड्याभरापूर्वी हा संबंधित पती एसएसपी कार्यालयात असलेल्या महिला कक्षात पोहोचला होता. तिथे त्याने महिला सेलच्या प्रभारींना तक्रार पत्र दिले आणि सांगितले की त्याच्या पत्नीला विडी ओढण्याची सवय आहे. मला त्याची अ‍ॅलर्जी आहे. तिच्या विडीच्या व्यसनामुळे माझी समाजातील प्रतिष्ठाही धुळीला मिळाली आहे. याबाबत त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगितले. पण, ती मात्र तिची सवय सोडत नाही.

( हेही वाचा :तुम्ही कोरोना लस घेतलीये ना? नाहीतर तुमचा मृत्यू होऊ शकतो! )

अखेर समेट घडली

या प्रकरणी त्याने पत्नीच्या माहेरातही तक्रार केली होती. मात्र, त्यांनी समजावूनही पत्नी मात्र ऐकायला तयार नव्हती. पतीने सांगितले की, यावरुन त्याच्या घरच्यांनी आणि मित्र परिवारानेही त्याला ब-याचदा सुनावले आहे.पोलिसांनी महिलेला विडी ओढण्याचे कारण विचारले असता, तिने सांगितले की, जेव्हा ती एखाद्या गोष्टीवर नाराज असते, तेव्हा ती विडी ओढते. त्यावर महिला सेल प्रभारीने तिला सांगितले की, तुझं शारीरिक नुकसान होण्यासोबतच पतीलाही तुझ्या विडी पिण्याने त्रास होत आहे. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. अखेरीस तीने यापुढे विडी न ओढण्याचे आश्वासन दिले आणि दोघांमध्ये समेट घडल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.