ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण वाद प्रकरणी वाराणसी दिवाणी न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. संपूर्ण मशीदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. जोपर्यंत मशिदीच्या कमिशनची कारवाई पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वेक्षण सुरूच राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वेक्षणाचा अहवाल 17 मे रोजी न्यायालयात सादर करावा लागणार आहे. न्यायालयाने सांगितले की, मशिदीच्या प्रत्येक कोपऱ्याचे सर्वेक्षण केले जाईल. ही कारवाई काटेकोरपणे पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने नियुक्त केलेले आयुक्त हटवले जाणार नाहीत
न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांना दणका देत, न्यायालयाचे आयुक्त अजयकुमार मिश्रा यांना हटवले जाणार नाही, असा आदेश दिला. एवढेच नाही तर मशिदीतील सर्वेक्षणाचे काम 17 मेच्या आधी पूर्ण करण्यात येणार आहे. 56(c) च्या आधारे, मुस्लिम पक्षांनी कोर्ट कमिशनरच्या बदलीची मागणी केली होती, जी दिवाणी न्यायाधीशांनी फेटाळली. 61 (क) च्या आधारे मुस्लिम पक्षाने मशिदीच्या आत सर्वेक्षणास विरोध केला होता.
( हेही वाचा: पॅन- आधार लिंक असेल, तरच करता येणार बॅंकेतील हा व्यवहार )
मुस्लिम पक्षाने केला होता विरोध
दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर, हिंदू धर्मीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वकिलांसह अनेकांनी एकमेकांना लाडू वाटून आनंद साजरा केला. या प्रकरणी न्यायालयाने 6 ते 10 मे दरम्यान सर्वेक्षण व व्हिडीओग्राफी करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुस्लिम पक्षाने विरोध करत सर्वेक्षण करु दिले नाही. वकील अजय मिश्रा यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत मुस्लिम पक्षाने बदलीची मागणी केली होती.
Join Our WhatsApp Community