उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू

148

उत्तराखंडची चार धाम यात्रा सुरु होऊन, केवळ 13 दिवस झाले आहेत. यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या महासंचालक डाॅक्टर शैलजा भट्ट यांनी सांगितले की, या सर्व मृत्यूंची कारणे उच्च रक्तदाब, ह्रदयविकाराच्या समस्या आणि माउंटन सिकनेस आहेत. केवळ 13 दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांचा मृ्त्यू झाल्याने, आरोग्य सेवेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्वे जारी केली असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या समस्यांचा भाविकांना करावा लागतो सामना

आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांमधील -2700 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या यात्रेकरुंना अत्यंत थंडी, कमी आर्द्रता, अतिनील किरणे, कमी हवेचा दाब यांचा सामना करावा लागतो. सोबत ऑक्सीजनची कमतरताही भासते. तसेच, आधीच आजारी असलेल्यांना डाॅक्टरांचा अहवाल, त्यांची औषधे आणि डाॅक्टरांचा फोन नंबर सोबत ठेवण्यास सागंण्यात आले आहे.

( हेही वाचा: मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना, 50 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू )

नवीन मार्गदर्शक सूचना जारी

नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, डोकेदुखी, चक्कर येणे, घबराट होणे, ह्रदयाचे ठोके जलद होणे, उलट्या होणे, हातपाय आणि ओठ निळे पडणे, थकवा येणे, धाप लागणे, खोकला किंवा इतर लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करण्यास सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.