केदारनाथमध्ये हेलिकाॅप्टर कोसळले. यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील केदारनाथपासून 2 किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकाॅप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी हेलिकाॅप्टरमध्ये 7 जण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे हेलिकाॅप्टर एका खासगी कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकाॅप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
#WATCH | Uttarakhand: A helicopter carrying Kedarnath pilgrims from Phata crashes, casualties feared; administration team left for the spot for relief and rescue work. Further details awaited pic.twitter.com/sDf4x1udlJ
— ANI (@ANI) October 18, 2022
( हेही वाचा: देशभरात 40 ठिकाणी NIA ची छापेमारी; अमंली पदार्थांच्या नेटवर्कवर कारवाई )
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकाॅप्टर केदारनाथहून परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो केदारनाथ धामचा जुना मार्ग होता. अपघाताच्या वेळी हेलिकाॅप्टरमध्ये सहा जण होते.
दाट धुक्यामुळे अपघात?
मदत आणि बचावकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकाॅप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Join Our WhatsApp Community