उत्तराखंडमध्ये हिमस्खलन! २८ प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अडकले; बचावकार्य सुरू

106

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील पर्वताच्या शिखरावर हिमस्खलन झाले असून यात २८ जण अडकले आहेत. यापैकी अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिमस्खलनाची घटना घडली तेव्हा जवळपास १७० गिर्यारोहकांचा एक गट प्रशिक्षण घेत होता. हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना वाचवण्यासाठी डेहराडूनमधील SDRF ची टीम आता घटनास्थळी दाखल झाली आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट! ५ ऑक्टोबरला वाहतुकीत होणार ‘हे’ बदल; अनेक मार्गावर ‘प्रवेशबंदी’, तर काही भागात ‘नो पार्किंग झोन’ )

२१ जणांचा शोध सुरू

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील पर्वताच्या शिखरावर अडकलेल्या २८ जणांपैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर २१ जणांचा शोध सुरू आहे. भारतीय हवाई दलाचे चित्ता हे हेलिकॉप्टर बचाव कार्यात तैनात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यासंदर्भात लष्कराची मदत मागितली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.