रेशन कार्ड धारकांना सरकारकडून दिलासा! आता FREE मिळणार LPG सिलिंडर

देशभरात वाढत्या महागाईने सर्वसमान्यांचे जीवन जगणं मुश्कील केले असताना सरकारकडून जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा उद्देश जनतेला केवळ दिलासा देणे हा असतो. त्याचबरोबर रेशनकार्डच्या माध्यमातून सरकारकडून लोकांना अनेक फायदे दिले जात आहेत. अशातच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आता मोठा दिलासा देत सरकारने शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच रेशन कार्डधारकांना दरवर्षी मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे स्वयंपाकघरातील गृहिणींचे बजेट कोलमडले असताना ते कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना वर्षभरात 3 गॅस सिलिंडर मोफत मिळू शकतात. मात्र त्यांच्याकडे अंत्योदय कार्ड असणं अनिवार्य आहे, असे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – CWG 2022: प. बंगालचा वेटलिफ्टर अचिंत शिऊलीने पटकावले सुवर्ण पदक)

तीन मोफत एलपीजी सिलिंडर मिळणार

उत्तराखंड सरकारने अंत्योदय कार्डधारकांना दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोफत एलपीजी गॅस योजनेचा एकूण 55 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. या निर्णयामुळे लाखो अंत्योदय कार्डधारकांना फायदा होणार आहे. ही योजना उत्तराखंड सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

अटी पूर्ण करणं आवश्यक

मोफत LPG गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी, उत्तराखंड सरकारने निश्चित केलेल्या काही अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे. दरवर्षी तीन एलपीजी सिलिंडर मोफत मिळण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहे…

  • लाभार्थी उत्तराखंडचा रहिवासी असणे अनिवार्य
  • पात्र लाभार्थी अंत्योदय शिधापत्रिकाधारक असणं बंधनकारक
  • अंत्योदय शिधापत्रिकाधारकाला गॅस कनेक्शन कार्डशी जोडणे आवश्यक
  • आधार कार्ड अंत्योदय कार्डशी लिंक असणं आवश्यक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here