उत्तराखंडमध्ये लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन, ४० प्रवासी अडकल्याची शक्यता

165

उत्तराखंडमधील तवाघाट लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली आहे. तांबा गावाजवळील डोंगराचा मोठा भाग महामार्गावर कोसळल्याचे व्हिडिओ ट्विटरवर समोर आले आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जवळपास 40 प्रवासी यात अडकून पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अलिकडच्या काळात उत्तराखंडमध्ये पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे राजस्थानमधील सुमारे 400 यात्रेकरू अडकले आहेत.

( हेही वाचा : कोकणातील बारसू, सोलगाव रिफायनरीला केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची मान्यता)

राजस्थानच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी संवाद साधून सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. यासोबतच त्यांच्या राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तराखंड प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हलगु गार्ड आणि गबनानी दरम्यानचा रस्ता गुरुवारी संध्याकाळपासून बंद आहे. राजस्थानसह इतर राज्यातील अनेक लोक येथे अडकले आहेत. एसडीआरएफचे अतिरिक्त महासंचालक यांनी उत्तराखंडमधील त्यांचे समकक्ष पोलीस अधिकारी-दीपम सेठ आणि डॉ. पीव्हीके प्रसाद यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.