V Shantaram : भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न – व्ही. शांताराम

304
V Shantaram : भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न - व्ही. शांताराम

शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही शांताराम (V Shantaram) किंवा शांताराम बापू… व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते होते. त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीवर राज्य गाजवलं. त्यांना फारसं शिक्षण घेता आलं नाही. किशोरवयात त्यांना नोकरी करावी लागली. सुरुवातील रेल्वेमध्ये त्यांनी अतिशय साधी नोकरी केली. त्यानंतर गंधर्व नाटक मंडळीमध्ये मजुरी केली.

पुढे बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म (V Shantaram) कंपनीत त्यांनी नोकरी केली. त्यांनी तिथे चित्रपट निर्मितीचे धडे गिरवले. प्रयोगशाळा सहाय्यक ते अभिनेता असा त्यांचा प्रवास झाला. पंचवीसाव्या वर्षी बाबूराव पेंटर यांच्या एका चित्रपटात त्यांनी शेतकर्‍याची भूमिका केली. सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी ’नेताजी पालकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. स्त्री, सिंहनाद परछाई, दो आंखे बारह हाथ असा चित्रपतात काम करुन त्यांनी आपल्या अभिनयाची कला दाखवली.

(हेही वाचा – Jayanti Dalal : एकांकिकाकार, प्रकाशक आणि राजकीय नेते – जयंती दलाल)

१९२९ साली त्यांनी ’प्रभात’ (V Shantaram) फिल्म कंपनीची स्थापना केली. मग त्यांनी ताजा हरिश्चंद्र, गोपाल कृष्ण, सूनी खंजीर, रानी साहेबा अशा चित्रपटांची निर्मिती केली. दरम्यान जर्मनीमध्ये जाऊन चित्रपटाचे आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी १९४२ मध्ये ’राजकमल कलामंदिर’ची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी प्रभातला सोडचिठ्ठी दिली.

(हेही वाचा – Alan Moore : कॉमिक्सच्य जगातला सम्राट – अॅलन मूर)

पुढे राजकमल कलामंदिर देशातील उत्तम स्टुडिओ म्हणून नावारुपाला आला. व्ही. शांताराम (V Shantaram) यांचां ’माणूस’ हा चित्रपट चार्ली चाप्लीन यांनी पाहिला होता आणि चाप्लीन यांनी त्या चित्रपटाचे कौतुकही केले होते. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. व्ही. शांतारम (V Shantaram) म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीने पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.