Indian Railways Rule: देशातील अशी पहिली ट्रेन ज्यामध्ये नॉन व्हेज Not Allowed!

104

तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करताय तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना तुम्ही तुमच्या सामानासह खाण्या-पिण्याच्या गोष्टी देखील घेऊन जात असाल..मात्र आता रेल्वेने जेवणाबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, आता ट्रेनमध्ये नॉन व्हेज म्हणजेच मासांहार जेवण खाणं किंवा बाळगणं यावर मनाई करण्यात आली आहे. पण थांबा ही घोषणा सामान्य ट्रेनसाठी नाही तर वंदे भारतमध्ये रेल्वेबद्दल कऱण्यात आली आहे. त्यामुळे वंदे भारत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

(हेही वाचा – Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण…)

मिळालेल्या माहितीनुसार, आता दिल्ली-कटरा वंदे भारत ट्रेनमध्ये नॉनव्हेज खाण्यास आणि नेण्यास मनाई करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन ही देशातील अशी पहिली ट्रेन आहे, जिला सात्विक प्रमाणपत्र देण्यात आले असल्याने आता ही ट्रेन पूर्णपणे हायजिनिक आणि शाकाहारी असणार आहे.

वंदे भारतला पहिले सात्विक प्रमाणपत्र

भारतीय रेल्वेनेही याची सुरुवात केली असून ट्रेनमध्ये खानपान सुविधा पुरवणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि सात्विक कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यात याआधीच एक करार करण्यात आला आहे. त्यामुळे या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी स्वतःसोबत मांसाहारी जेवण नेऊन प्रवासादरम्यान खाऊ शकत नाहीत.

बाकीच्या गाड्याही सात्विक होणार

IRCTC ने वंदे भारत ही सात्विक ट्रेन बनवण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेच्या मते, हळूहळू धार्मिक स्थळी जाणाऱ्या इतर गाड्याही सात्विक केल्या जाणार आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी असे आहेत, जे धार्मिक यात्रेला जात आहेत आणि त्यांना पूर्णपणे सात्विक जेवण करायला आवडते. त्यामुळे उर्वरित गाड्याही सात्विक केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रवासादरम्यान, अनेक प्रवाशांना ट्रेनमध्ये दिले जाणारे जेवण आवडत नाही. कारण ट्रेनमध्ये मिळणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी आणि आरोग्यदायी असेलच याची खात्री नसते. प्रवाशांच्या मनात जेवणाबाबत साशंकता असते. ट्रेनमध्ये जेवण बनवताना स्वच्छतेची किती काळजी घेतली गेली, व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळे शिजवले जाते का, जेवण बनवण्यापासून ते सर्व्ह करण्यापर्यंतची प्रक्रिया काय असेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. अशा प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने सात्विक ट्रेन सुरू केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.