नवे तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुविधा असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मुंबई-सोलापूर (पुणेमार्गे) आणि मुंबई-शिर्डी (नाशिकमार्गे) असा वंदे भारत एक्स्प्रेसचा मार्ग असणार आहे. साईनगरी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण आता साई भक्तांना एका दिवसात दर्शन करून आपल्या घरी येणे शक्य होणार आहे. परंतु या मार्गावरील ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे तिकीट दर आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. तसेच या तिकीटदरांत IRCTCच्या खाद्यपदार्थांचा समावेश नाही. त्यामुळे प्रवाशांना जीभेचे चोचले पुरवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या एक्स्प्रेसचे टाईम टेबल आणि तिकिटाचे दर जाणून घ्या.
मुंबई-सोलापूर मार्गाचे वेळापत्रक
मुंबई-सोलापूर अंतर पार करण्याठी आता सहा तास ३० मिनिटे लागणार आत्त. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस दुपारी ४.१० मिनिटांनी मुंबईहून रवाना होणार असून पुण्यात सायंकाळी ७.१० मिनिटांनी पोहोचेल; तर सोलापूरला रात्री १०.४० मिनिटाला मुक्कामी असणार आहे. सोलापूरहून परतीचा प्रवास दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता सुरू होणार असून, सीएसएमटीला दुपारी १२.३५ वाजता संपणार आहे.
मुंबई-शिर्डी मार्गाचे वेळापत्रक
मुंबई-शिर्डी अंतर पार करण्याठी आता पाच तास ३० मिनिटे लागणार आहेत. सीएसएमटीहून सकाळी ६.१५ वाजता रवाना होणार असून, दुपारी १२.१० वाजता पोहोचेल. त्याच दिवशी परतीचा प्रवास ५.२५ वाजता सुरू होऊन रात्री ११.१८ मिनिटांनी एक्स्प्रेस मुंबईत पोहोचेल. यामुळे साई भक्तांना एका दिवसात दर्शन करून आपल्या घरी येणे शक्य होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर
ठिकाण चेअर कारसाठी एक्झिक्युटीव्ह श्रेणी
मुंबई- पुणे मार्ग ५६० रुपये ११३५ रुपये
मुंबई-नाशिक मार्ग ५५० रुपये ११५० रुपये
मुंबई-शिर्डी मार्ग ८०० रुपये १६३० रुपये
मुंबई-सोलापूर मार्ग ९६५ रुपये, तर १९७० रुपये
खाद्यपदार्थांसाठी आता नवे पर्याय
नाश्ता – ज्वारी/शेंगदाणा, चिवडा/भडंग, साबुदाणा खिचडी, बेसन पोळा आणि ज्वारी भाकरी
जेवण
(शाकाहारी)– शेंगदाणा पुलाव, मटार शेंगदाणा पुलाव, नाचणी भाकरी, झुणका
(मांसाहारी)– सावजी चिकण, चिकण तांबडा रस्सा, चिकण कोल्हापूरी
संध्याकाळचा नाश्ता – शेगाव कचोरी, कोथिंबीर वडी, थाली पीठ, भडंग, साबुदाणा वडा, भाकरवडी
(हेही वाचा – मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार सुसाट! वॉटर टॅक्सी सेवा सुरू, किती असणार भाडे?)
Join Our WhatsApp Community