सेवेत दाखल झाल्यानंतर सहाव्या दिवशीच ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात

171

मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला गुरुवारी अपघात झाला. वटवा स्टेशन ते मनीनगर दरम्यान रेल्वे मार्गावर म्हशींचा कळप आल्याने सकाळी 11.15 च्या सुमारास हा अपघात झाला. ट्रेनच्या इंजिनच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ जेके जयंती यांनी ही माहिती दिली. या रेल्वेच्या समोरील भागाचे नुकसान झाले असले तरी रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

(हेही वाचा –“तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी वाढवायला सांगा, कारण…”, फडणवीसांचा ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला!

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर 1 ऑक्टोबरपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. मात्र सेवेत दाखल झाल्यानंतर अवघ्या सहाव्याच दिवशी वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वरून ही ट्रेन दुपारी 2 वाजता सुटली आणि संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचली. नवीन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सेमी-हाय स्पीड ट्रेनने अहमदाबाद ते मुंबई दरम्यानचे 492 किमीचे अंतर साडेपाच तासात कापले.

वंदे भारत ट्रेनच्या सीरीजमधील ही तिसरी ट्रेन

महाराष्ट्र आणि गुजरातच्या राजधान्यांना जोडणारी ही ट्रेन वंदे भारत ट्रेनच्या सीरीजमधील तिसरी ट्रेन आहे, जी देशात चालवण्यात आली आहे. या सीरीजमधील पहिली ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान तर दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते माता वैष्णो देवी, कटरा दरम्यान सुरू करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.