सहायक पोलीस उपनिरीक्षक शेखर पांढरे यांचा ‘वारली चित्रा’तून ‘हर घर तिरंगा’ चा संदेश

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने “ हर घर तिरंगा ” अभियान राबवण्यात येत आहे. शासनाने संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअतंर्गत 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होऊन घरा घरात, प्रतिष्ठानात व विविध कार्यालयामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात येऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने वणी येथील वारली चित्रकार व सहायक उपनिरीक्षक पोलिस शेखर वांढरे यांनी हर घर तिरंगा या वारली चित्रातून जनजागृती केली आहे.

 शेखर वांढरे हे वणी शहरातील वारली पेंटिंगमध्ये एकमेव पोलिस खात्यातील असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम  वारली पेंटिंगने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नविन काही विशेष करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

( हेही वाचा: लवकरच देशात CAA होणार लागू ; शुभेंदु अधिकारी यांची माहिती )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here