Varanasi Serial Blast Case: 16 वर्षांनंतर निकाल, दोषी वलीउल्लाला फाशीची शिक्षा

गाझियाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १६ वर्षांपूर्वी वाराणसीमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या वलीउल्लाला सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. त्याच्यावर २.६५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर जिल्हा व सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी शनिवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी वलीउल्लाह याला दोषी ठरवले आणि शिक्षेवर निकाल देण्यासाठी ६ जूनची तारीख निश्चित केली होती आणि सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सिन्हा यांनी ही शिक्षा जाहीर केली.

दुर्मिळातील दुर्मिळ खटल्याचा निकाल 

न्यायालयाने हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ मानला आणि दोषी दहशतवादी वलीउल्लाला आज फाशीची शिक्षा सुनावली आणि त्याला विविध कलमांखाली एकूण २.६५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तत्पूर्वी, दोषी वलीउल्लाहला कडेकोट बंदोबस्तात डासना कारागृहातून आणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

(हेही वाचा – Jan Samarth Portal: ऑनलाइन कर्ज घेणं होणार सोपं, आता १३ सरकारी योजना मिळणार एकाच प्लॅटफॉर्मवर!)

काय आहे प्रकरण

7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील कॅंट रेल्वे स्टेशन आणि संकट मोचन मंदिरात बॉम्बस्फोट झाले. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावरही स्फोटके सापडली होती. 5 एप्रिल 2006 रोजी पोलिसांनी प्रयागराजमधील फुलपूर गावात राहणाऱ्या वलीउल्लाला अटक केली. वलीउल्लाहवर संकट मोचन मंदिर आणि वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोटांचा कट रचण्याचा आणि दहशतवाद पसरवण्याचा आरोप होता, असे जिल्हा सरकारी वकील राजेश शर्मा यांनी सांगितले. वाराणसीतील वकिलांनी वलीउल्लाचा खटला लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे प्रकरण गाझियाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात वर्ग केले. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here