वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी ज्ञानवापी मशिदीतल्या तलावाचे पाणी उपसून तिथे व्हिडीओ ग्राफी करण्यात आली. मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारी पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे.
मागच्या तीन दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरु आहे. आज या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे.
Join Our WhatsApp Community