राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने पर्यटन विभागाकडून वीर सावरकर पर्यटन सर्किट आणि वीरभूमी परिक्रमा असे विविध उपक्रम राबवून अनोखी मानवंदना देण्यात येत असल्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले आहे.
(हेही वाचा – मॉरिशसमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी अनावरण)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने स्वतंत्र्य संग्रामात भाग घेवून मोलाचे योगदान देणारे थोर, महात्मा आणि क्रांतीकारकांचा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान युवा पिढीला स्मरणात रहावे यासाठी शासन स्तरावर पर्यटन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच वीर सावरकर पर्यटन सर्किटमध्ये कोणकोणत्या स्थळांचा समावेश आहे, भगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर वाड्याचे स्थानमहात्म, वीरभूमी परिक्रमा हा उपक्रम आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार काय आहे याबाबत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. २६ मे, २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community