Veer Savarkar : बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांसह राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिन साजरा 

Veer Savarkar :  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कारागृह मुक्ततेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

332
Veer Savarkar : बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांसह राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिन साजरा 
Veer Savarkar : बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांसह राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिन साजरा 

१९२१ मध्ये अंदमानातून मुक्तता झाल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे ६ जानेवारी १९२४ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कारावासातून मुक्तता झाली. येरवडा कारागृहातून ८ जानेवारी १९२४ ला सावरकरांना रत्नागिरीला नेण्यात येऊन स्थानबद्ध करण्यात आले आणि प्रारंभ झाला त्यांच्या १३ वर्षांच्या ‘समाजक्रांती पर्वा’चा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कारागृह मुक्ततेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यात मुक्ती शताब्दी यात्रा

New Project 4 3

स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षानिमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृह (Yerwada Jail) ते फर्ग्युसन महाविद्यालय (Ferguson College) अशी स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Yatra) काढण्यात आली. भाजपचे सुनील देवधर यांनी सावरकर स्मारकाजवळ यात्रेचे स्वागत केले. या यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar), अभिनेते रणदीप हुडा, अभिनेते शरद पोंक्षे, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, ब्रिगेडियर हेमंत महाजन, भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोळकर, अनंत पणशीकर, सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने, स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात विनता जोशी आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. मुक्ती शताब्दी दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या यात्रेची संकल्पना रणजित सावरकर यांची होती, तर यात्रेचे संपूर्ण नियोजन मंजिरी मराठे यांनी केले.

ठाण्यातही बाईक रॅली 

WhatsApp Image 2024 01 06 at 9.58.49 PM

याच दिवशी ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहापासून ते मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकापर्यंत बाईक रॅलीचे (Bike rally) आयोजन करण्यात आले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची नात असिलता राजे-सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर यांचा सहभाग होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन 

WhatsApp Image 2024 01 06 at 9.45.28 PM

६ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. त्या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale), स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि ‘सावरकर’ सिनेमाचे अभिनेता राजदीप हुडा हे उपस्थित होते.

WhatsApp Image 2024 01 06 at 9.45.29 PM

या वेळी ‘तपपूर्ती’ नाटकाचा नाट्यप्रवेश सादर करण्यात आला. यानंतर वीर सावरकर लिखित गीत ‘प्रियकर हिंदुस्थान’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. त्या गीताला संगीत वर्षा भावे आणि संगीत संयोजन सोमेश नार्वेकर यांनी केले, तर स्मयन आंबेकर यांनी हे गीत गायले आहे. तसेच अभिनेता रणदीप हुडा यांनी वीर सावरकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सावरकर’ (Savarkar) या चित्रपटाचा टिझर दाखवण्यात आला. कार्यक्रमानंतर ‘सावरकर लाईट अँड शो’चे आयोजन करण्यात आले. त्याला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.