स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने संघाकडून मानवंदना 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ५७वा आत्मार्पण दिन झाला, त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वीर सावरकर यांना मानवंदना देण्यात आली.

संघाच्या ६० स्वयंसेवकांनी घोषचे वादन करून ही मानवंदना देण्यात आली. यावेळी घोष वादकांनी आनक, वेणू, मधुरिका व शंख याचे वादन केले. प्रत्येक वाद्याच्या 3 रचना वाजवण्यात आल्या, त्यानंतर जयोस्तुते हे गीत आणि विनायक ही रचना घोष वर वाजवण्यात आली. यावेळी संघ स्वयंसेवक उपस्थित होते. त्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर बौद्धिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला सिद्धिविनायक भागाचे अधिकारी आणि दादर नगर अधिकारी उपस्थित होते. घोष वादन झाल्यावर आनंद राय यांनी आपल्या बौद्धिकामधून वीर सावरकरांचा जीवनपट उलगडला.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी नीलम गोऱ्हेंसह विविध मान्यवरांची सावरकर स्मारकाला भेट)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here