Veer Savarkar : मुरबाड येथील महाराष्ट्र मिलीटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील अनेक पैलूंवर आणि विषयावर विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले विचार मांडतात. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना अधिवक्ता कै. अशोक इनामदार स्मृती चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येतो.

400
Veer Savarkar : मुरबाड येथील महाराष्ट्र मिलीटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न

सोमवार (२६ फेब्रुवारी २०२४) रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या ५८ व्या आत्मार्पण दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पत्र देऊन निमंत्रित करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाराष्ट्र मिलीटरी स्कूल मुरबाड, येथे मागील पंचवीस वर्षांपासून शाळेच्या वतीने सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील अनेक पैलूंवर आणि विषयावर विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले विचार मांडतात. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना अधिवक्ता कै. अशोक इनामदार स्मृती चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येतो. (Veer Savarkar)

या वक्तृत्व स्पर्धा आयोजनाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासह वक्तृत्व कलेस प्रोत्साहन देणे हा आहे. या स्पर्धेसाठी अ, ब, क, या तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. सर्व सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह प्रमाणपत्र, व कै. अशोक इनामदारम स्मृती चषक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी लेखक, सावरकर भक्त, प्रा. हेमंत चोपडे व मुरबाड मधील जेष्ठ भा. ज. पा. नेते, संस्थाचालक, हिंदूत्ववादी वक्ते, मा. जुगलभाई जाखोटिया, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी केले. (Veer Savarkar)

New Project 2024 02 27T131628.089

(हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर कायम)

भाषणातून सावरकरांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न

आपल्या प्रास्ताविकात त्यांनी या स्पर्धेचा उद्देश आणि हेतू स्पष्ट करुन ही स्पर्धा विद्यार्थ्यांना केवळ भाषण करण्याची संधी देत नसून स्वातंत्र्यवीरांच्या देशभक्ती आणि देशप्रेमातून शिकण्याची प्रेरणा मिळत असून या स्पर्धेमधून सावरकर (Veer Savarkar) विचारांचे सिंचन विद्यार्थी मनावर होते असे सांगितले. तसेच सद्यस्थितीत सावरकरांचे विचार अंगिकारणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यानंतर स्पर्धेचे नियम आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर गटागटातील विद्यार्थ्यांनी सावरकरांवरील (Veer Savarkar) अनेकविध विषयांना स्पर्श करून भाषणे सादर केली. सर्वच स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावरकरांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या भाषणांना उत्स्पुर्थ दाद दिली. (Veer Savarkar)

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संबोधित करताना मा. जुगलभाई जाखोटिया म्हणाले, की स्वा. सावरकरांच्या (Veer Savarkar) सैनिकी शिक्षणाची प्रत्यक्ष प्रचिती या शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त आणि वर्तणूक बघून आली. ही शाळा शाळेय शिक्षणाबरोबरच देशप्रेमाचे धडे देत आहे हे बघून खूपच आनंद झाला असे ते म्हणाले. व स्वर्गीय विक्रमराव सावरकरांचे सैनिकी शाळेचे स्वप्न या ठिकाणी साकार होत असल्याची प्रचिती आली. असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की यापूवी स्वा. सावरकरांविषयी बोलणे हा देशात गुन्हा समजला जात होता. पण आज आपण सर्वजण स्वा. सावरकरांबद्दल (Veer Savarkar) खुलेआम बोलू शकतो, हे बदलेल्या सामर्थशाली भारताचा नवीन चेहरा आहे असे सांगितले. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Manoj Jarange Patil यांची भाषा राजकीय; चौकशीतून सगळे समोर येईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा)

New Project 2024 02 27T131855.666

सावरकर विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजण्यास सुरुवात

विद्यार्थ्यांची भाषणे ऐकून जुगलभाई पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना सावरकर (Veer Savarkar) किती समजले यापेक्षा सावरकर विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजण्यास सुरुवात झाली, सावरकर विचाराचे सिंचन झाले. हे खूप महत्त्वाचे आहे. या शाळेने सावरकर विचार रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याकरिता त्यांनी शाळेचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. हेमंत चोपडे यांनी सावरकरांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून सावरकरांबद्दलचे विचार स्पष्ट करून सावरकरांना आदरांजली वाहिली. (Veer Savarkar)

विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच बाबतीत माहिती आपल्याला सहज उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यासात आणि स्वातंत्र्यवीरांसारख्या थोर विभूतिंची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे व ते वाचून आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावा असे ते म्हणाले. सावरकर (Veer Savarkar) हा थोडक्यात मांडण्याचा विषय नाही असे सांगून त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील विविध पैलू स्पष्ट केले. शालेय शिक्षणसोबत सावरकरांचा कोणताही एक विचार घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे गेले पाहिजे. सद्यस्थितीत देशाची ती गरज आहे असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी किशोरी भोईर, खंडू भोईर, छाया विशे, ज्ञानेश्वर गरड यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. राजेंद्र तिवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन प्रमोद देसले यांनी केले. राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (Veer Savarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.