स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीला १४१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त विरार येथील “एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे वीर सावरकर यांना ‘तोफांची नाही, तर रोपांची’ आगळीवेगळी सलामी देण्याचा उपक्रम १५ जून २०२४रोजी राबवण्यात आला. या ऐतिहासिक कार्यक्रमाला विरार येथील वीर सावरकर मित्र मंडळाने आपले योगदान दिले. (Veer Savarkar)
श्री जीवदानी संस्थान यांच्या परवानगीने वन खात्याची जमीन आणि भारतीय रोपे उपलब्ध करून देण्यात आली. विरार पूर्व येथे जीवदानी देवी मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी १४१ रोपे लावून त्या रोपांचे ३ वर्षांकरिता संवर्धन करण्याचा संकल्प “एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे करण्यात आला आहे. या वृक्षरोपणाला वसई-विरार शहर महानरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या हस्ते प्रथम रोप लावून सुरुवात झाली.
(हेही वाचा – किल्ले रायगडावर १९ जूनपासून Shivrajyabhishek Din सोहळा)
वृक्षारोपण कार्यक्रमात स्थानिक सावरकरप्रेमींनी सहभाग घेतला. प्रत्येक रोप लावताना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा जयघोष करण्यात आला. सर्वांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले. वृक्षप्रेमी आणि सावरकरप्रेमी यांचा अनोखा संगम येथे पाहायला मिळाला. विशेष म्हणजे लावलेल्या प्रत्येक रोपांची नोंद अक्षांश आणि रेखांशासहित ठेवण्याची सोयही येथे केली जाईल तसेच ३ वर्षे स्वखर्चाने या रोपांचे संवर्धन करण्याचे वचन यावेळी “एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट”तर्फे ट्रस्टी उमेश गुप्ता यांनी दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community