Veer Savarkar Premiere Show: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला उदंड प्रतिसाद, तरुणांच्या जयघोषाने दुमदुमले सिनेमागृह

या चित्रपटाचा ट्रेलर ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरने समाजातील सर्व घटकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होताना जवळपास ९० टक्के तरुण वर्गाचा सहभाग होता.

4039
Veer Savarkar Premiere Show: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाला उदंड प्रतिसाद, तरुणांच्या जयघोषाने दुमदुमले सिनेमागृह

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खरा इतिहास नव्या पिढीला कळावा, या उद्देशाने अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या विशेष चित्रपट वीर सावरकर विचार मंच, नवी मुंबईतर्फे शुक्रवारी (२२ मार्च) कोपर खैरणे येथील बालाजी मुव्हीप्लेक्स येथे एकाच वेळी दोन स्क्रीनवर दाखवण्यात आला. अनेक महाविद्यालयीन युवक-युवतींनी या चित्रपटाला उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला. (Veer Savarkar Premiere Show)

WhatsApp Image 2024 03 22 at 21.28.48

या चित्रपटाचा ट्रेलर ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरने समाजातील सर्व घटकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होताना जवळपास ९० टक्के तरुण वर्गाचा सहभाग होता. चित्रपटात दिग्दर्शनाबरोबरच वीर सावरकर यांची व्यक्तिरेखाही अभिनेता रणदीप हुड्डानेच साकारली आहे. प्रेक्षकांनी त्याच्या भूमिकेला मनापासून दाद दिली. सिनेमा सुरू होण्याआधीच वीर सावरकर यांच्या जयघोषाने सिनेमागृह दणाणून सोडले. (Veer Savarkar Premiere Show)

WhatsApp Image 2024 03 22 at 21.28.49 1

(हेही वाचा – Veer Savarkar Movie: स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एंट्री!)

WhatsApp Image 2024 03 22 at 21.28.49

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला मानवंदना
सावरकर विचार मंचने आयोजित केलेल्या या विशेष चित्रपटासाठी वीर सावरकरांचे नातू आणि मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, वीर सावरकरांची नात असिलता सावरकर-राजे, नितिन राजे, स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश म्हात्रे, डॉ. वैशाली म्हात्रे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. चित्रपटापूर्वी रा.फ.नाईक विद्यालयात दीपप्रज्वलन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी सर्व निमंत्रित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

WhatsApp Image 2024 03 22 at 21.28.49 2

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.