Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष देशभरात शासकीय कार्यक्रम म्हणून साजरा व्हावा; खासदार राहुल शेवाळे यांची मागणी 

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या वेळी विशेष मागणी केली.

211
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष देशभरात शासकीय कार्यक्रम म्हणून साजरा व्हावा; खासदार राहुल शेवाळे यांची मागणी 
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष देशभरात शासकीय कार्यक्रम म्हणून साजरा व्हावा; खासदार राहुल शेवाळे यांची मागणी 

१४ वर्षांच्या कठोर कारावासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Veer Savarkar) मुक्तता झाली, तो दिवस होता ६ जानेवारी १९२४ ! यंदा त्या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण राज्य सरकारकडे प्रमुख मागण्या करत त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष हे राज्यभरातच नव्हे, तर देशभरात साजरे व्हावे, त्याला शासकीय कार्यक्रम म्हणून मान्यता द्यावी, अशी प्रमुख मागणी करत आहे, असे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) म्हणाले.

(हेही वाचा – BMC : आपला दवाखाना, मुंबई सुशोभीकरण आणि स्वच्छतेचे ११८ कोटींचे ‘बेस्ट’ संदेश)

स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Varsha) निमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी खासदार शेवाळे बोलत होते. या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, ‘सावरकर’ चित्रपटाचे अभिनेते रणदीप हुडा हे उपस्थित होते.

वीर सावरकरांवरील धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा

राज्य सरकारकडे आपण या निमित्ताने ज्या मागण्या करणार आहोत, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दर महिन्याला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम घ्यावा, काँग्रेसने क्रांतिकारकांचा इतिहास दडपला आणि शालेय अभ्यासक्रमात खोटा इतिहास शिकवला, तो बदलावा. तसेच वीर सावरकरांवरील धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात क्रांतिकारकांच्या शौर्याच्या गाथा (Tales of bravery of revolutionaries) शिकवल्या जाव्यात, सावरकरांनी (Veer Savarkar) मराठी भाषेसाठी केलेले कार्य हे मराठीच्या अभ्यासक्रमात घेण्यात यावे, तसेच वीर सावरकर यांनी जे समाजक्रांतीचे कार्य सुरु केले तो १७ एप्रिल हा दिवस समाजक्रांतीदिन म्हणून साजरा केला आदी मागण्याही करणार आहोत, असेही खासदार शेवाळे (MP Rahul Shewale) म्हणाले.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाहीच; भुजबळांचा ओबीसी मेळाव्यात स्पष्ट नकार)

स्वातंत्र्यसैनिकांना जातीपातींमध्ये विभागणे दुर्दैवी  

सध्याची राजकीय परिस्थितीत पाहिली, तर सर्व स्वातंत्र्यसैनिकांना जातीपातींमध्ये विभागण्यात येत आहे. प्रत्येक जातीने त्यांच्या त्यांच्या जातीचा स्वातंत्र्यसैनिक वाटून घेतला आहे. त्याच जातीचे लोक त्यांच्या जातीच्या स्वातंत्र्यसैनिकाची जयंती-पुण्यतिथी साजरी करत आहेत. हे सर्व सध्याच्या राजकारण्यांमुळे होत आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. या जाती निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी प्रयत्न केले, असेही खासदार राहुल शेवाळे म्हणाले. दोन जन्मठेप सहन करतांना वीर सावरकरांनी मरणयातना सहन केल्या. त्यानंतरही सध्याचे राजकारणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भोगलेल्या त्या शिक्षेवर अवमानकारक टीकाटिप्पणी करत आहेत. हे चुकीचे आहे, असेही खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

…याचा मला अभिमान

मी ज्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहे, त्यामध्ये हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे आणि दुसरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मारक आहे, याचा मला अभिमान आहे. अंदमानात (Andaman) वीर सावरकरांच्या काव्यपंक्ती काढून टाकल्यानंतर त्या पुन्हा लावण्यात याव्यात, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मी खासदार होताच सहा महिन्यांत या काव्यपंक्ती अंदमानात लावल्या, याचा मला अभिमान आहे, असे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.