Veer Savarkar : शिवराज्याभिषेक समितीकडून रणजित सावरकर यांना ‘मराठा धोप तलवार’ भेट

177
Veer Savarkar : शिवराज्याभिषेक समितीकडून रणजित सावरकर यांना 'मराठा धोप तलवार' भेट

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४१ वी जयंती मंगळवार, (२८मे) रोजी विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारां’सह गाथा शिवशौर्याची, शिवसंस्कार, संगीत शिवस्वराज्यगाथा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगडकडून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना ‘मराठा धोप तलवार’ भेट देण्यात आली. (Veer Savarkar)

‘मराठा धोप तलवारी’चे वैशिष्ट्य आणि तलवार देण्याच्या उद्देशाविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त आणि शिवराज्याभिषेक समिति दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महाराजांकडून प्रेरणा घेतली. अंदमान तुरुंगात अनेक हालअपेष्टा सोसल्या. त्यांचा वारसा त्यांचे नातू रणजित सावरकर चालवत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून कट्टर देशभक्त घडवायचे आहेत, असा निश्चय त्यांनी केला आहे. त्यामुळेच आज स्मारकात रायफल शुटिंग, बॉक्सिंग, कराटे, ज्युडो अशा प्रकारचे स्वसंरक्षणविषयक प्रशिक्षण देणारे विविध उपक्रम राबवले जातात. आता लवकरच तलवारबाजीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये ‘मराठा धोप तलवार’ असावी, असा विचार मनात आला. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Veer Savarkar : राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर; स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त भगूर येथे मान्यवरांनी केले अभिवादन)

पुरातन तलवारीची भेट

शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगडकडे ‘मराठा धोप तलवार’ संग्रही होती. विशेष म्हणजे रायगडावर दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होतो. हजारो मावळ्यांचा रायगडावर ३ दिवस मुक्काम असतो. त्यावेळी स्मारकाकडून सर्व प्रकारची मदत केली जाते. कार्यकर्त्यांचा त्यांना मोलाचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी आम्ही स्मारकराचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना ‘मराठा धोप’ ही अतिशय पुरातन तलवार भेट दिली. आतापर्यंत शिवराज्याभिषेक समितीने यापूर्वी कोणालाही तलवार भेट दिली नव्हती, ही पहिलीच तलवार आहे, जी कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना भेट देण्यात आली, अशा भावना सुनील पवार यांनी व्यक्त केल्या. (Veer Savarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.