स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या ५८व्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथील त्यांच्या जन्मस्थान स्मारकात सावरकर भक्त, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि बागेश्री गायनतर्फे देशभक्तीपर विचार आणि गीतातून त्यांना संगीतमय आदरांजली वाहण्यात आली.
सोमवारी सकाळी वीर सावरकर वाड्यात एकनाथराव शेटे, मनोज कुवर, भूषण कापसे यांनी वीर सावरकर यांच्या जन्म खोलीत विधिवत पूजन केले. त्यानंतर शासकीय पूजनही झाले. व्यवस्थापक मनोज कुवर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी योगेश बुरके, खंडू रामगडे, दीपक गायकवाड, संभाजी देशमुख, सुनिल जोरे, उपस्थित होते.
(हेही वाचा – Role of Education in Human Capital Formation : मानवी कौशल्यविकासात शिक्षणाची भूमिका)
नाशिक येथील बागेश्री वाद्यवृंद गायक आणि कलाकारांनी वीर सावरकरांनी लिहिलेली ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्रण तळमळा’, ‘जयोस्तुते जयोस्तुते’, ‘शतजन्म शोधिताना’, अभंग, पोवाडे, आरती गायली. चारुदत्त दीक्षित, राजेंद्र सराफ, मनीषा इनामदार, माधुरी गडाख, वृषाली घोलप, दीपक दीक्षित यांनी भाग घेतला. एकनाथराव शेटे, मृत्युंजय कापसे, जितेंद्र भावसार, प्रताप गायकवाड, खंडेराव खैरनार या कलाकारांनी वीर सावरकरांना संगीतमय आदरांजली वाहिली.
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. समुहाचे मनोज कुवर, ओंकार आव्हाड, दीपक गायकवाड, प्रशांत लोया, संभाजी देशमुख, खंडू रामगडे, गणेश राठोड, सुभाष पुजारी आदींनी परिश्रम घेतले तसेच स्मारकात सावरकर जयंती उत्सव समितीचे सदस्य प्रताप पवार, अशोक मोजाड, किशोर खर्डे, प्रशांत कापसे, वीर सावरकर समुहाचे मंगेश मरकड, प्रशांत लोया, संभाजी देशमुख, वृक्षमित्र तानाजी भोर, समाजसेवक कैलास भोर, पत्रकार प्रमोद राहणे, विलास भालेराव, सुभाष कांडेकर, प्रशांत दिवंदे, भाजपचे सुनिल बच्छाव, तनुजा घोलप, प्रसाद आडके, निलेश हासे, शरद कासार, विलास कुलकर्णी, शिरीष पाठक, नचिकेत महाजन आदींनी अभिवादन केले तसेच भोसला मिलिटरी स्कूल नाशिक यांच्या वतीने सकाळी ५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्मारकात सावरकरांना सलामी देऊन अभिवादन केले.
भगूर येथील वीर सावरकर स्मारकात ज्योती भागवत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राची आकर्षक रांगोळी काढून वातावरण प्रसन्न केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community