Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कुटुंबातील महिलांचा त्याग, बलिदान लोकांसमोर आणण्याची गरज – मंजिरी मराठे

पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनने यमुनाबाई (माई) विनायक सावरकर यांच्या १३६ व्या जयंती निमित्त बुधवार, ४ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला आहे.

216

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास सांगताना त्यांच्या कुटुंबातील महिलांचा त्याग, बलिदान लोकांसमोर आणण्याची आवश्यकता असल्याचे मत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी व्यक्त केले. पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) फाउंडेशनने यमुनाबाई (माई) विनायक सावरकर यांच्या १३६ व्या जयंती निमित्त बुधवार, ४ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या सोहळ्यात कर्तुत्ववान महिलांचा यमुनाबाई (माई) विनायक सावरकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी मंजिरी मराठे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

savarkar 9

यावेळी मंजिरी मराठे म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध घटकांचे महत्व आहे, स्वातंत्र्यसेनानींच्या लढ्यात, सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबियांचाही मोठा वाटा राहिलेला आहे, विशेषत: महिलांचा त्याग, बलिदान मोठे होते. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) इतिहास सांगताना त्यांच्या कुटुंबातील महिलांचा त्याग, बलिदान लोकांसमोर आणण्याची आवश्यकता आहे. सर्वच क्रांतिकारकांच्या वीरपत्नी, माता, भगिनी या प्रत्यक्ष तुरुंगात जरी नसल्या तरी समाजात राहून जन्मठेपच भोगत होत्या. अतिशय धैर्याने त्या साऱ्या परिस्थितीला सामोरे जात होत्या आणि हीच प्रेरणा आपण येसू वहिनी, माई आणि सगळ्या क्रांतिकारकांच्या आणि आपल्या वीर जवानांच्या वीरपत्नी आणि वीरमाता यांच्याकडून घ्यायची आहे. आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना, नातवंडांना या सर्वांच्या शौर्य कथा सांगून त्यांना प्रेरित करायचं आहे. कारण आपल्या देशाचं संरक्षण शेवटी तरुण पिढीलाच करायचं आहे, असेही मंजिरी मराठे म्हणाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणेच्या वतीने सेवा भवन, पटवर्धन बाग, एरंडवणा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाल साहित्यिक डॉ. संगीता बर्वे,  गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहेंदळे, राष्ट्र सेविका समिति पुणे महानगर कार्यवाहीका ज्योती भिडे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीतम थोरवे, विश्वस्त श्रीराम जोशी, प्राची देशपांडे, नयन ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा CM Devendra Fadnavis यांच्या शपथविधीनंतर विशेष अधिवेशनाची घोषणा)

याप्रसंगी प्रियांका केरकर (दांडपट्टा आणि लाठी काठी प्रशिक्षक), डॉ. उज्चला पळसुले (आर्किटेक्ट हेरिटेज). सोनाली छत्रे ( मुख्याध्यापिका, मुळशी), सीए अंजली खत्री, सीमा दाबके (समाजसेविका दिव्यांग मुले, मुली) यांचा यमुनाबाई माई विनायक सावरकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

पुढे बोलताना मंजिरी मराठे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर (Veer Savarkar) यांना वयाच्या २८ व्या वर्षी काळ्यापाण्याची शिक्षा झाली, तत्पूर्वी बाबराव सावरकर सुद्धा अंदमानात शिक्षा भोगत होते. सावरकर बंधु शिक्षा भोगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर सुद्धा जप्ती आणली होती यामुळे कुटुंबातील महिला बेघर झाल्या होत्या, तरीही त्यांनी संयमाने संसार सांभाळला. सावरकरांनी रत्नागिरी येथे वास्तव्यास असताना केलेल्या अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रमात यामुनाबाई सक्रिय सहभागी होत्या, त्यांनी स्पृश्य समाजातील महिलांमध्ये जनजागृती घडविण्याचे काम केले. दुर्दैवाने त्यांचे कार्य समाजापुढे फारसे न आल्याची खंत मंजिरी मराठे यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू समाजाला एक करण्यासाठी प्रयत्न केले होते, अखंड हिंदुस्थान हे त्यांचे स्वप्न होते मात्र आज आपल्या देशात हिंदू समाजाला आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. हिंदू समाजाने आज एक होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे, असे सांगत मंजिरी मराठे यांनी ओम प्रमाणपत्र वितरण चळवळी विषयी माहिती देऊन त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन केलं. हिंदूंच्या व्यवसाय वृद्धीसाठी आपल्याच बांधवांकडून खरेदी करण्याचं, जागा विकताना, भाडेकरू ठेवताना ते आपलेच बांधव असतील याची खात्री करून घेण्याचं आवाहनाही मंजिरी मराठे यांनी केलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रीतम थोरवे यांनी केले. तर  सूत्रसंचालन ऋचा कुलकर्णी यांनी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.