सावरकरांचा तिरंग्याला विरोध होता अशा बाता जमात ए फुरोगामी मारतील, तुम्हाला खिजवायचा प्रयत्न करतील. पण तुम्ही ठासून सांगा सावरकरांचा तिरंग्याला विरोध तर नव्हताच उलट आपला राष्ट्रीय ध्वज कसा असावा या विषयी उपयुक्त सूचना देणारे दोन लेख त्यांनी लिहिले. सावरकर साहीत्यातील स्फुट लेख या पुस्तकात ते समाविष्ट आहेत. त्यात तिरंग्याचीच प्रशंसा केली आहे. हिंदु महासभा या पक्षाचा ध्वज मात्र भगवाच असला पाहिजे हे त्यांनी ठासून सांगितले असून तिरंग्यावरील चरख्याला मात्र तीव्र विरोध केला आहे. तिरंग्यावरील चक्रालाही त्यांचा विरोध नव्हताच. चक्राला ते कधी कधी सुदर्शन चक्र असेही संबोधत असत.
हिंदुहृदय सम्राट सावरकरांच्या या लेखातील काही भाग पुढे देत आहोत
“…हिंदूचे तर काय? त्यांच्या धर्माच्या उदार ब्रह्मदृष्टीस सर्व रंग त्या त्या परीने आवडतेच आहेत! त्यांच्या पूजेच्या फुलांच्या परडीत लाल लाल जास्वंदी आणि रक्तकमळे, हिरव्यागार दुर्वा आणि बेल, पांढरी शुभ्र जाई-जुई आणि मोगरा, ही सर्व एकत्र आणि एकमेकांची शोभा वाढवीत भरलेली असतात आणि त्यांचा देव ते सर्व ‘पत्रं पुष्पं फलं तोयं’जी जो जे जे ‘भक्त्या प्रयच्छति’ते ते आनंदाने स्वीकारतो! ते त्या ध्वजातील तिन्ही रंगास प्रेमाने पाहात पाहात आनुवंशिक तत्वाप्रमाणे भावनेने उद्गारातील, वा वा! किती समर्पक! रक्त, हरित, शुभ्र! तामस आणि राजस आणि सात्विक या तिन्ही सृष्टीच्या अभ्युदय निःश्रेयसास कारणीभूत झालेल्या गुणांचा हा कोण मनोहर समन्वय! एका भारताचाच नव्हे तर भारतीय संस्कृतीचे सात्त्विक वर्चस्वास मुग्ध होऊन उभे जगत् जेव्हा या तिरंगी केतूच्या विस्तीर्ण पटलाखाली एकत्र होईल, तेव्हा हा ध्वज उभ्या मानुषकाचा ध्वज देखील शोभू लागेल. मानुषकाच्या सर्व वर्णांचे वैशिष्ट्य राखूनही त्यांची शेवटी त्या शुभ्र वर्णाच्या त्या ‘तमसः परस्तात्’अशा सौम्य द्योतीत कशी सुंदर एकात्मकता झालेली आहे.
राष्ट्रीय ध्वजाचे त्या राष्ट्राच्या राजकीय ध्येयास व्यक्त करण्याचे जे मुख्य कार्य, ते करूनही मनुष्याच्या धार्मिक किंवा नैतिक किंवा तात्त्विक आकांक्षासही उपकारकच असणार्याी आजच्या या ध्वजावरील रंगांस वरील कारणासाठी बदलण्याची काही एक निकड आहे असे आम्हास वाटत नाही. परंपरेचे दृष्टीनेही ते रंग उपकारकच आहेत, विरुद्ध तर नाहीतच नाहीत. अभिनव भारताच्या ध्वजावरही हेच तीन रंग असत.”
स्फुट लेख- स्वातंत्र्यवीर सावरकर
– संकलन – चंद्रशेखर साने
Join Our WhatsApp Community