बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’(Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचा टिझर सोमवार, ४ मार्च रोजी जुहू येथील पीव्हीआर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले. (Veer Savarkar) या टिझरला एका तासात एका लाखांहून जास्त व्ह्यूज आणि दीड हजारांवर कॉमेंट्स मिळाल्या आहेत. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा टिझर हिट झाला आहे. (Veer Savarkar)
या टिझरमध्ये अभिनेता रणदिप हुड्डा (Randeep Hooda) यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेत त्यांनी म्हटलेल्या शेवटच्या ओळीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. टिझरमध्ये शेवटी ते म्हणाले आहेत की, ‘काँग्रेसच्या कोणालाही काळ्या पाण्याची शिक्षा का होत नाही?’ चित्रपटातील वीर सावरकर यांच्या तोंडी असलेल्या हे वाक्य प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. त्यांनी या वाक्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. (Veer Savarkar)
(हेही वाचा- Electoral Bonds: इलेक्टोरल बाँड्स माहिती देण्यासाठी मुदतवाढीची मागणी, भारतीय स्टेट बँकेची सर्वोच्च न्यायालयाला विनंती)
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे सशस्त्र क्रांतीची ज्योत पेटवणारे वीर सावरकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपटात वीर सावरकर यांची प्रमुख भूमिका केलेले रणदीप हुड्डा यांच्यासोबत चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित, संदीप सिंह, योगेश रहार उपस्थित होते. प्रेक्षकांना २२ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता येईल. (Veer Savarkar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community