Veer Savarkar : ‘भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल’ हे पुस्तक म्हणजे वीर सावरकर यांना आदरांजली – बिग्रेडीयर हेमंत महाजन

पुस्तकाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, भारताची सागरी सुरक्षा हे पुस्तक ३ भागांत विभागलेले आहे.

159
Veer Savarkar: भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि... हे पुस्तक म्हणजे वीर सावरकर यांना आदरांजली - बिग्रेडीयर हेमंत महाजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त रविवार, २६ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या ‘भारताची सागरी सुरक्षा, चिंता आणि पुढील वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुखे पाहुणे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. (Veer Savarkar)

या प्रसंगी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सन्मान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते वीर सावरकर यांची प्रतिमा भेट देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासह आयआयटी इंदूरचे डॉ. सुहास जोशी, सावरकर विचार प्रसारक संस्थेचे विद्याधर नारगोळकर आणि ‘स्वातंत्र्यवीर’ चित्रपटाचे निर्माते, लेखक, अभिनेते रणदीप हुड्डा हे उपस्थित होते.

(हेही वाचा- Pune Car Accident प्रकरणी क्राईम ब्रँचकडून ससूनमधील डॉक्टरांना अटक!)

पुस्तकाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, भारताची सागरी सुरक्षा हे पुस्तक ३ भागांत विभागलेले आहे. त्यातील पहिला भाग नौदल, तटरक्षक दल, सागरी सुरक्षेचा इतिहास, समुद्रकिनाऱ्यावर होणारे वर्तमान धोके आणि उपाययोजना, भारतीय महासागरी व्यूहरचनेची उत्क्रांती, बाह्य धोके, अंतर्गत धोके आणि सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि भारतीय सागरी पोलीस याविषयी माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाचा दुसरा भाग पोलीस, अवैध मासेमारी, अवैध वसाहती, दारूगोळ्याची तस्करी आणि अंदमान व निकोबारमधील वसाहती नसलेल्या बेटांचा, दहशतवादी गटांकरवी तसेच तस्करांकरवी लपण्यासाठी, माल लपवण्यासाठी केला जाणारा वापर हे पुस्तक सागरी सुरक्षेचे महत्त्वाचे घटक अधोरेखित करते, तर पुस्तकाच्या तिसऱ्या भागांत गुप्तवार्ता, कार्यवाही – कृतियोग्य गुप्तवार्ता हीच यशाची गुरुकिल्ली, महासागरी कायद्याची चौकट, खासगी महासागरी सुरक्षा एजन्सीज आणि सागरमाला, इतर सागरी सुरक्षा दल कसे कार्य करते? आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती, भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती देण्यात आली आहे.

सुरक्षेच्या आव्हानांचा सामना करायला सुरुवात
पुढे ते म्हणाले की, भारताच्या समुद्रकिनाऱ्याचं भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये महत्त्वाचं योगदान आहे, कारण भारताला १६,००० किलोमीटरची जमिनी सीमा आहे. भारताला ७,६०० किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनाऱ्याचं रक्षण करणं अतिशय आव्हानात्मक आहे. याशिवाय भारताला दोन द्विपसमूह आहेत. एक अंदमान निकोबार आयलंड. त्यामध्ये ७५० आयलंड्स आहेत. फक्त २५ किंवा २६ आयलंड्सवर माणसं राहतात. दुसरं लक्षद्विप आणि मिनिकॉय आयलंडस्. जिथे २५च्या आसपास आयलंड्स आहेत आणि फक्त ६ आयलंड्सवर माणसं राहतात. असं म्हटलं जातं की, जे महाशक्ती देश होते. या महाशक्ती देशांचा उदय जिथे समुद्रकिनारा होता, अशा ठिकाणी झाला. आपण आपल्या समुद्रकिनाऱ्याचा वापर चांगला केला नाही. याचा गैरवापर जास्त झाला. सध्या सागरी सुरक्षेला असलेले धोके म्हणजे स्मगलिंग, दहशतवादी हल्ला होणं, शस्र, दारूगोळा येणं, चीन आणि पाकिस्तानकडून इतरही पारंपारिक धोके आहेत. आपल्या समु्द्रकिनाऱ्यावरून ड्रग्ज प्रचंड प्रमाणात अजूनही येत आहेत. सध्या आपण एक नवीन प्रोग्रामा सुरू केला आहे. त्यामध्ये समुद्राच्या संपत्तीचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करत आहोत, मात्र भारताची २० टक्के लोकसंख्या ही समुद्रकिनाऱ्यावर राहाते. ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांना समुद्र लाभला आहे. आपल्याला मिळालेला प्रचंड किनारा आणि समुद्राचा आपण उपयोग करायला पाहिजे, तो आपण करायला सुरुवात केली आहे; परंतु यावर आपल्याला पुष्कळ काम करायला हवे. आपल्याला असलेल्या सुरक्षेच्या आव्हानांचा बऱ्यापैकी मुकाबला करायला आपण सुरुवात केली आहे. प्रत्येक नागरिक जो समुद्रकिनाऱ्यावर राहतो त्यामध्ये नेव्ही, कोस्टगार्ड, फिशलिस्ट विभाग किंवा राहणारे कोळी बांधव हे सगळेच जण जोपर्यंत आपलं काम निभावत नाही. तोपर्यंत आपला किनारा सुरक्षित होणार नाही तसेच समुद्राच्या संपत्तीचं आपल्याला उत्खनन करता येणार नाही.

पुस्तकं वाचण्याचं आवाहन
सावरकर स्टॅटॅजिक स्टडी सेंटरचं हे सहावं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक पाकिस्तानवर आधारित होतं, दुसरं आणि तिसरं बांगलादेशी घुसखोरी हे मराठी आणि हिंदी भाषांमध्ये आहे. चौथं सागरी सुरक्षा भाग १, भाग २, आणि सहावं सागरी सुरक्षा भाग ३. ज्यांना या विषयात अभ्यास करायचं आहे, त्यांनी ही पुस्तके अवश्य वाचावीत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

‘हे’ पुस्तक म्हणजे वीर सावरकर यांना आदरांजली
वीर सावरकर जेव्हा पोर्टब्लेअरला होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, ज्यावेळी मी या समुद्राकडे बघतो तेव्हा अंदमान-निकोबार आयलंड ही भारताच्या समुद्रकिनाऱ्यापासून १२०० नॉटिकल माईलवर असलेली अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत. असं जहाज कधीच बुडवलं जाऊ शकत नाही आणि हे भारताचं रक्षण १२०० किलोमीटर दूर करू शकतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे अशी फारच कमी व्यक्तिमत्त्वे आहेत की, ज्यांनी अशा प्रकारे समुद्राविषयी अभ्यास केला होता. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे त्यांच्यासाठी आदरांजली आहे. आज सगळ्यात भाग्याची गोष्ट ही की, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर पुस्तक प्रकाशनावेळी उपस्थित आहेत, हा आमच्यासाठी गौरवशाली क्षण आहे, अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.