१०० वर्षांपूर्वी जी आपण चूक केली ती आपण टाळली नाही, तर १९४७ साली जी फाळणी झाली त्याची पुनरावृत्ती २०४७ साली होईल. १९४७ साली पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूंना इथे हिंदुस्थान तरी शिल्लक होता. २०४७ साली फाळणी झाली तर तुम्हाला जगात जायला कुठे जागा उरणार नाही, असा इशारा देत याचे गांभीर्य ओळखा आणि एकसंघ हिंदू समाज निर्माण करा. आपल्या देशाचा नेता हिंदू हिताचा विचार करणारा हवा असा निर्धार करा. सावरकरांचा हिंदू एकसंध झाला तर तुम्ही ८० टक्केच रहाल, २० टक्के तुमच्या डोक्यावर उभे राहण्याची हिंमत करणार नाही, असे स्वातंत्र्यवीर (Veer Savarkar) सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष, वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणजित सावरकर बोलत होते. या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, ‘सावरकर’ चित्रपटाचे अभिनेते रणदीप हुडा हे उपस्थित होते.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे देशात 50 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल; ‘या’ वस्तूंना मोठी मागणी)
हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई
शंभर वर्षांपूर्वी सावरकर यांनी सांगितलेले समाजाने ऐकले नाही, त्यामुळे १९४७ साली फाळणी झाली. आज आपल्याला संधी आहे. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीनिमित्ताने जी यात्रा काढली ती सावरकरांच्या सन्मानाची यात्रा नाही. सावरकरांना सन्मानाची आवश्यकता नाही. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. सावरकरांचे नाव घेऊन त्यांचे विचार घेऊन आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ही यात्रा आहे, असेही रणजित सावरकर म्हणाले.
…म्हणून वीर सावरकरांनी हिंदुत्वाची नवीन व्याख्या बनवली
वीर सावरकर अंदमानात होते तेव्हा तिथे मुसलमान कैदीही होते, वीर सावरकर यांनी त्यांना विचारले, तुम्ही गांधींच्या सोबत कसे? तेव्हा ते मुसलमान म्हणाले, आम्ही गांधींसोबत नाही तर गांधी आमच्यासोबत आहेत. मुसलमान कैद्यांमधील ही विचारधारा सावरकरांना विचार करण्यास भाग पाडणारी ठरली. तेव्हा त्यांनी हिंदू कैद्यांमधील जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला. सहभोजन सुरु केले. हा जातीभेद संपूर्ण भारतात खूप खोल रुजलेला होता, हे सावरकरांनी जाणले. ब्रिटीशांची फोडा आणि राज्य करा ही पॊलिसी केवळ त्यांचीच नव्हती, तर भारतावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येक आक्रमणकर्त्यांची होती. म्हणूनच अल्लाउद्दीन खिलजी हा केवळ ५ हजारांची सेना घेऊन येतो आणि देवगिरीतील साम्राज्य बुडवतो, तेंव्हा आपल्या तालवारींना गंज चढला होता. आपल्या तलवारी एकमेकांच्या विरुद्ध लढत होत्या. जेव्हा आपल्या तलवारी एकमेकांच्या विरुद्ध लढल्या जातात, तेव्हा शत्रू त्याचा फायदा घेतो. हे सावरकरांनी ओळखले आणि हिंदुत्व म्हणजे काय याची त्यांनी नव्याने व्याख्या केली. जो कुठला धर्म, पंथ या भारतात जन्मलेला आहे. मग तो शीख असो, वैदिक असो, बुद्ध असो, जैन असो, आदिवासी असो तो हिंदू. त्यांच्यात कुठलाही भेदभाव नको, असेही रणजित सावरकर म्हणाले.
…म्हणून २० टक्के समाज बहुसंख्याकांच्या ठिकाणी गुंडगिरी करतोय
आपण ८० टक्के असलो तरी आपण कधीच बहुसंख्य नाही, कारण आपण जातीपातीत विभागलो आहोत. भारतात ४ हजार जाती आहेत. १२० कोटींना ४ हजारांनी भागले तर तुम्ही २ टक्केही उरत नाही. मग तुमचा २० टक्के असलेला शत्रू, तो तुम्ही बहुसंख्य असलेल्या ठिकाणी येतो, गुंडगिरी करतो, तुमच्या डोक्यावर बसतो. हे १९२१ साली झाले, १९४७ साली झाले आणि २०२१ सालीही झाले. सीएए कायद्याच्या विरोधात ज्या दंगली झाल्या, तो हिंदू समाजावर कलंक आहे. लाखा लाखांचे मोर्चे निघाले, कुणासाठी? इथल्या मुसलमानांसाठी काही प्रॉब्लेम होता का? अजिबात नव्हता. पाकिस्तान, बांगलादेशातील मुसलमानांना नागरिकत्व द्यावे, यासाठी त्या दंगली होत्या. त्यावेळी आपण बहुसंख्य असलेल्या शहरांमध्ये आपल्या मालमत्ता जाळण्यात आल्या. कारण सावरकरांनी १९२३ साली हिंदू एकसंध व्हावा यासाठी जातीभेद निर्मूलन आंदोलन जे सुरु केले, त्याकडे आपण लक्ष दिले नाही. अस्पृश्यता निर्मूलन हा अतिशय सोपा शब्द आहे, पण गांधींनी त्यांना हरिजन म्हणा, असे म्हटले. म्हणजे नाव बदलले, पण गट वेगळाच ठेवला. सावरकरांनी त्याला विरोध केला, नाव बदलून चालणार नाही, जातीपाती नष्ट करून हिंदू एकसंध झाला पाहिजे, असा सावरकर यांचा आग्रह होता. मग त्यांनी ७ बंद्या मोडून काढल्या. आज त्या मोडल्या गेल्या असल्या तरी जातीभेद आपल्या मनातून गेलेला नाही. आज जातीभेद पूर्वी होता त्याच्या अनेक पटीने उफाळून आला आहे, असेही रणजित सावरकर म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community