‘सागरा प्राण तळमळला’…112 वर्षे पूर्ण! विरार येथे केले स्मरण

160

तब्बल ११२ वर्षांपूर्वी म्हणजेच १० डिसेंबर १९०९ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’ या कवितेची रचना केली. मातृभूमीच्या विरहर्थ रचलेल्या ह्या अद्वितीय काव्याचं चिंतन हे सावरकरांच्या अतिउत्कट व प्रखर राष्ट्रभक्तीच द्योत्तक आहे.

स्मारकाकडे पालिकेचे दुर्लक्ष

विरार येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाची साफ सफाई करत स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आजच्या या दिवसाचं स्मरण करण्यात आले. या स्मारकाभोवती फेरीवाल्यांचा विळखा पडला असून, या स्मारकाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नई दिशा संस्थाचे अध्यक्ष वीरेंद्र मळेकर, वसईचा राजाचे मानद सचिव, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी राहुल भांडारकर, शिवप्रेमी देवेंद्र कांबरे व आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांच्या उपस्थितात सदरचा उपक्रम झाला व सावरकरांच्या या अद्वितीय प्रतिभेला विनम्र अभिवादन केले.

स्मारकाजवळ विद्युतीकरण करणार

सोबतचा दिवस वगळता संध्याकाळनंतर हे स्मारक अंधारमय होते याची दखल घेत नई दिशा संस्थाचे अध्यक्ष वीरेंद्र मळेकर, वसईचा राजाचे मानद सचिव, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी राहुल भांडारकर, शिवप्रेमी देवेंद्र कांबरे व आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी येत्या काही दिवसांत हा अंधार कायमस्वरूपी घालवून सावरकांचे स्मारक प्रकाशित होण्यासाठी काही दिवसातच स्मारकाजवळ विद्युतीकरण करण्यात येणार आहे.  यासाठी स्मारकाशेजारी असणार्‍या श्री कृष्णा हाॅटेलचे मालक शेट्टी यांनी सहकार्य करण्याचे दर्शविले आहे.  येत्या काही दिवसांत लवकरच स्मारक प्रकाशमय झालेले असून सारवरकरांच्या विचारांना आणि स्मारकाला पुन्हा नव्याने उजाळा देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.

 ( हेही वाचा: ‘महापौर पेडणेकरांसह कुटुंबाला ठार मारणार’ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.