Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिला ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’

1412
Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिला 'स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’
Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिला 'स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) निर्मित ‘स्वातंत्र्यवीर’ हा भव्य, नाविन्यपूर्ण उपक्रम लाईट अँड साऊंड शो (Light and Sound Show) राष्ट्रप्रेमींना सावरकरांच्या (Veer Savarkar) जीवनपटाचा परिचय करून देतो. शनिवार, ११ जानेवारी या दिवशी दादर, पश्चिम येथील साने गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता ५ वी आणि ६ वीच्या (Sane Guruji English Medium School) सुमारे २५० विद्यार्थ्यांनी हा शो पाहिला. त्यांच्यासाठी या शोचे २ सत्रांत प्रसारण करण्यात आले आहे.

New Project 13 1
Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिला ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’
अत्यंत माहितीपूर्ण शो – पालकांचा अभिप्राय

‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’ अत्यंत माहितीपूर्ण आहे. या व्हिडिओमुळे सावरकरांच्या जीवनपटाविषयी कळले. ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’ पाहिल्यामुळे आपण देशासाठी काय योगदान देऊ शकतो, हे समजले, असा अभिप्राय पालकांनी दिला. क्षितीजा कुलकर्णी यांनी या वैशिष्ट्यपूर्ण शोचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिला 'स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’

(हेही वाचा – मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांचे विधान)

असा आहे ‘लाईट अँड साऊंड शो’

वॉलमॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित हा भारतातील पहिला कायमस्वरूपी आणि व्यक्तीचित्रणात्मक असा भव्य शो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात ६६ फूट x ९४ फूट भिंतीवर हा कार्यक्रम दाखविला जातो. यासाठीचा प्रोजेक्टर २७ फूट उंचीवरील एका मनोऱ्यात ठेवण्यात आला आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी तात्पुरती गॅलरी उभारण्यात आली असून एका वेळेला १५० प्रेक्षक हा कार्यक्रम बघू शकतात. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर राष्ट्राभिमानी, क्रांतीकारक, संवेदनशील कवी, लेखक होतेच पण द्रष्टेही होते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्तेही होते. त्यामुळे त्यांच्यावरील कलाकृती साकारताना कला आणि तंत्रज्ञानाचा संगम असणे अत्यावश्यक होते.

सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहचविणारी नेत्रदीपक कलाकृती

‘स्वातंत्र्यवीर’ या लाईट अँड साऊंडची शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन, ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या अप्रतिम चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांची आहे. तर स्मारकाच्या या अतिशय आगळ्या-वेगळ्या, महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पेलली आहे. हा भव्य लाईट अँड साऊंड शो म्हणजे सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचविणारी एक आधुनिक आणि नेत्रदीपक कलाकृती आहे.

विशेष आवाहन

आपल्या कौटुंबिक औचित्याच्या प्रसंगी, जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या निमित्ताने आप्तेष्टांसाठीही मागणीप्रमाणे या विशेष शोचे आयोजन करता येईल. त्यासाठी कृपया सावरकर स्मारकाशी संपर्क (संपर्क क्रमांक – ०२२ २४४६५८७७) साधावा.

त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना या माध्यमातून वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) कार्याचा परिचय करून देता येईल. त्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी क्षितीजा कुलकर्णी (संपर्क क्रमांक – ९३२२२१२५७७) यांच्याशी संपर्क साधावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.