विद्याधरपंत नारगोळकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या १८ अक्षरी क्रांती गीतेतील हिंदुत्व हा एक अध्याय आहे. सावरकरांनी त्यांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात हिंदुत्वाची संकल्पना स्पष्ट केलीच आहे. त्या व्यतिरिक्त १९३७ ते १९६१ पर्यंतच्या विविध व्याख्यानातून व लेखांद्वारे ती अधिक स्पष्ट केली आहे. त्या सर्वांचा एकत्र विचार करता, जोपर्यंत या जगतामध्ये ‘हिंदू’ म्हणून ज्यांचा परिचय करून दिला जातो अशी जी मानव जात आहे तोपर्यंत तरी ‘हिंदुत्वाला’ निश्चितच भवितव्य आहे. (Veer Savarkar)
भाषा प्रभू पु. भा. भावे आपल्या सावरकर सूत्रांच्या संदर्भात हिंदुत्वच का? या लेखात म्हणतात, ‘हिंदुत्वाची अवनीती ही आमची उन्नती असू शकत नाही. हिंदुत्वाचा पराभव हा आमचा पराभव असणारच असणार! हिंदुत्व मेले तर आम्ही जगत नाही, हे राष्ट्र जगत नाही, कारण या देशात ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ आहे. हिंदुत्व हा आमचा प्राणवायू आहे. ती आमची प्रेरणा व चेतना आहे. आमच्या अस्तित्वाचे कारणच मुळी हिंदुत्व आहे. (Veer Savarkar)
हिंदुत्वाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी सावरकरांनी ‘हिंदू’ या शब्दाची पुढील व्याख्या केली आहे.
‘आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका | पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदूरिति स्मृत:’|
या व्याख्येत बसणाऱ्यांचा जो धर्म तो हिंदू धर्म. हिंदू लोक ज्या धर्ममतांना व मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग म्हणजे हिंदू धर्म! देव देवतांच्या संत महंतांच्या जयंती पुण्यतिथी उत्सवातून, यात्रांमधून साधकांच्या वारकऱ्यांच्याद्वारे हिंदू धर्मीयांचे जे प्रगटीकरण होत असते ते पाहता हिंदू धर्म ज्या एका संकल्पनेचे उपांग आहे त्या हिंदुत्वाचे भवितव्य उज्वल आहेच आहे. (Veer Savarkar)
(हेही वाचा – BMC : पावसाळापूर्व कामांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची घाटकोपर, विक्रोळी, मुलुंडमध्ये धाव)
हिंदुत्वामध्ये हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक आणि सामाजिक व राजकीय अंगाचाही समावेश होतो. ‘हिंदुत्व’ या ग्रंथात सावरकरांनी पुढील कळकळीचा संदेश दिला आहे. जोपर्यंत हिंदुस्थानात राहणाऱ्या जाती पहिल्याने आपण हिंदुस्थान राष्ट्राचे नागरिक आणि नंतर इतर जे काही असे सांगत नाहीत किंवा सर्व जगातल्या जाती पहिल्याने आपण मानवता ओळखतो नंतर जे काही असे सांगण्यास सिद्ध झालेल्या नाहीत, परंतु उलट अत्यंत आकुंचित असे जातीय किंवा धार्मिक किंवा राष्ट्रीय असे हेतू डोळ्यासमोर ठेवून संरक्षक आणि आक्रमक असे संघ किंवा फळ्या उभारीत आहेत तोंवर हिंदू बंधूंनो! ज्यांच्यामुळे तुमच्या जातीचा एकाधिक आणि एकात्म असा समाज देह बनलेला आहे त्या ज्ञानतंतूंच्या जाळ्याप्रमाणे समाज देहात पसरलेल्या सूक्ष्म बांधवांना शक्यतो अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करा.
(हेही वाचा – Bomb Threat in Mumbai : हॉटेल ताज आणि विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी)
सावरकरांनीच या व्याख्यानात म्हटले होते, मला मुसलमानांची किंवा ख्रिश्चनांची भीती वाटत नाही, मला भीती वाटते ती हिंदूंची. म्हणजेच जोपर्यंत हिंदू हे हिंदुत्वाचा विश्वासघात करीत नाही तोपर्यंत तरी हिंदुत्वाचे भवितव्य उज्वलच राहणार आहे. त्याच्यापुढे जाऊन सावरकर वल्गना करतात, माझे गाणे मला गाऊ द्या. जगात आपणाला हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगायचे असेल तर तसा आपणाला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदू ध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत माझी ही वल्गना खरी ठरेल. हेच हिंदुत्वाचे भवितव्य आहे. (Veer Savarkar)
|| जय जय रघुवीर समर्थ||
(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री आहेत.)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community