Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

207
Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण, भव्य उपक्रमांचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार -२०२४’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच २३ मे ते २६ मे या कालावधीत ‘गाथा शिवशौर्याची’, ‘शिवसंस्कार’, ‘रक्तदान शिबिर’ आणि ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे. (Veer Savarkar)

वीर सावरकर यांच्या आदर्श विचारांना अनुसरून राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार -२०२४’ कर्नल सचिन अण्णाराव निंबाळकर यांना आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार – २०२४’ भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी (आय. एन. ए.) चे डॉ. सुहास जोशी यांना घोषित झाला आहे, तर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार – २०२४’ अभिनेता रणदीप हुड्डा यांना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कालातीत विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे विद्याधर जयराम नारगोळकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार – २०२४’ पुरस्कार घोषित झाला आहे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजपाची हॅटट्रीक की इंडिची मुसंडी?)

पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन
रविवारी, २६ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सायंकाळी ७ वाजता बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. राजशिष्टाचार असल्यामुळे सायंकाळी ठिक ६.३० वाजता सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लेखक ले- ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या ‘भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी केले जाणार आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन
संपूर्ण शिवचरित्र, आपली संस्कृती, आपले गडदुर्ग, शिवकाळातील परिचित-अपरिचित योद्धे आणि अशा सर्वच विषयांवर आधारित १०० चित्रकाव्यांचे भव्य कलादालन ४ दिवस म्हणजेच दि. २३, २४, २५, २६ मे २०२४ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. सकाळी १० वा. ते रात्री ८ वाजेपर्यंत हे दालन सर्वांसाठी खुले असेल. (प्रवेश विनामूल्य आहे.)

गाथा शिवशौर्याची
शनिवारी, २५ मे आणि रविवारी, २६ मे रोजी सकाळी ११ ते रात्री ९ वाजता शिवकालिन दुर्मिळ नाणी, भारतीय आणि परदेशी नोट/नाणी, वस्तू तसेच गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येईल.

संगीत शिवस्वराज्यगाथा

संपूर्ण शिवशाहीवर आधारित ४२ नवगीतांमधून साकारलेल्या धगधगत्या संगीतमय शिवचरित्राचे सादरीकरण रविवार दि. २६ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे असेल. गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई, दीप्ती आंबेकर, अनिल नलावडे हे यात सहभागी असतील, तर ओघवत्या शैलीतील शिवचरित्र कथन पद्मश्री राव यांचे असेल. शिवकाव्यांचे सादरीकरण हे स्वतः अनिल नलावडे करतील. या गीतांना भव्य एलईडी स्क्रीनवर जुन्या ऐतिहासिक चलचित्रांची साथसोबत असेल. ( प्रवेश विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य).

रक्तदान शिबिर
रविवारी, २६ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजता मादाम कामा सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.